म.टा. प्रतिनिधी, अहमदाबाद : अहमदाबादमधील सुमारे ३६ शाळांना धाडलेले बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ई-मेल पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. ७ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर धमकीचे ई-मेल पाठवून नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.७ मे रोजी गुजरातमधील लोकसभेच्या २६पैकी २५ जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले. तर, सुरतमधील उमेदवार निवडणुकीआधीच बिनविरोध विजयी झाला आहे. स्वतःची ओळख तौहीद लियाकत अशी सांगणाऱ्या व्यक्तीने हे धमकीचे ई-मेल ‘मेल.रू’ या डोमेनवरून सर्व शाळांना पाठवले होते.
मतदार आणि भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवण्यासाठी त्याने हे कृत्य केले, अशी माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली.