आईवर गोळी झाडली, पत्नीवर हातोडीने वार, पोरांना छतावरुन खाली फेकलं अन् भाऊ…

सीतापूर: रात्री गाढ झोपेत असताना अचानक किंचाळण्याचा आणि गोळी झाडल्याचा आवाज आला आणि मी दचकून जागा झालो. बाहेर येऊन पाहताच समोरील दृश्य पाहून मला धडकीच भरली. माझा भाऊ माझ्या दिशेने बंदुक घेऊन धावत येत होता. मी तात्काळ दरवाजा बंद केला. हा प्रसंग कुठल्या अॅक्शन-थ्रिलर चित्रपटातील नाही, तर सत्यात घडला आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या हत्याकांडमध्ये बचावलेल्या व्यक्तीने ही आपबीती सांगितली आहे. या घटनेतील आरोपी हा व्यसनी आणि मानसिक विक्षिप्त असल्याचं सांगितलं जात आहे.

सीतापूर जिल्ह्याच्या रामपूर मथुराच्या ग्राम पल्हापूर येथे रात्रीच्या अंधारात अंगावर काटा आणणारी भयंकर घटना घडली आहे. या हत्याकांडाने सारेच हादरल आहेत. येथे एका व्यक्तीने आपल्या आई, पत्नी आणि ३ मुलांची हत्या करुन स्वत:वरही गोळी झाडून घेतली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. यावेळी आरोपीच्या भावाने रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.

आरोपी अनुराग सिंह याचा भाऊ अजितने सांगितलं की रात्री तो त्याच्या खोलीत झोपलेला होता. तेव्हा रात्री अडीच-तीन वाजताच्या सुमारास त्याला गोळी झाडल्याचा आवाज आला. आरडाओरड ऐकून तो जेव्हा त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा समोरील दृश्य पाहून तो खूप घाबरला. यानंतर त्याचा भाऊ त्याला मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावत येत होता. तेव्हा अजितने स्वत:ला खोलीत बंद करुन घेतलं.

सीतापूरचे एसएसपी चक्रेश मिश्रा यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘मथुराच्या रामपूर पोलिसांना माहिती मिळाली की मानसिक आजारी असलेल्या एका व्यक्ती ज्याचं नाव अनुराग सिंह (वय ४५) आहे त्याने स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी आपल्या कुटुंबातील ५ जणांची हत्या केली. पोलिस आणि एफएसएल टीम या प्रकणाचा तपास करत आहेत. या घटनेचा चौफेर तपास सुरु आहे.’

पोलिसांनी सांगितलं की आरोपी ही मानसिक रोगी होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या आईवर गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर पत्नीला हातोडीने संपवलं तर मुलांना छतावरुन खाली फेकलं. मृतांमध्ये आरोपी अनुरागसह, आई सावित्री देवी (६५), ४० वर्षीय पत्नी आणि ६, ९ आणि १२ वर्षांच्या पोरांचा समावेश आहे.

Source link

mental illnessSitapur Family Murdersitapur family tragedySitapur Man Killed 5 PeopleSitapur murder casesitapur murder newsउत्तर प्रदेश क्राइमसीतापूर कुटुंबातील ५ जणांची हत्यासीतापूर हत्याकांड
Comments (0)
Add Comment