Dell युजर्ससाठी सावधानतेचा इशारा; 4.9 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक

लॅपटॉप बनवणारी कंपनी डेलच्या लाखो युजर्सची माहिती डेटा लीक झाल्यामुळे समोर आली आहे. हॅकर्सनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे जवळपास 5 कोटी डेल यूजर्सचा डेटा आहे. एका नवीन अहवालात असे समोर आले आहे की, सुमारे 4.9 कोटी युजर्स या लीकमुळे प्रभावित झाले आहेत. तथापि, कंपनीने म्हटले आहे की युजर्सना काळजी करण्याची गरज नाही आणि त्यांचे आर्थिक तपशील किंवा पासवर्ड सुरक्षित आहेत.

लाखो युजर्सची माहिती लीक झाल्याची भीती

ब्लीपिंग कॉम्प्युटरने आपल्या अहवालात म्हटले आहे की, लाखो युजर्सची माहिती लीक झाली आहे, ज्यात त्यांचे नाव, पत्ता आणि फोन नंबर इत्यादींचा समावेश आहे. डेलचा दावा आहे की, कोणतीही संवेदनशील माहिती किंवा पासवर्डशी तडजोड केली गेली नाही. टेक कंपनीने म्हटले आहे की, सदर लीक हि एका अधिकृत विक्रेत्याबरोबर झालेल्या हॅकिंग प्रकरणामुळे झाली आहे. यामध्ये चुकीच्या मार्गाने डेटामध्ये प्रवेश मिळवण्यात आला होता.

डेल कंपनीने केली प्रकरणाची चौकशी सुरू

डेल कंपनीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून सदर विक्रेत्यासोबतचा करार संपुष्टात आणला आहे. कंपनीने म्हटले आहे की,युजर्सना काळजी करण्याची गरज नाही आणि ज्यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते किंवा त्यांना इतर घोटाळ्यांचे बळी बनवले जाऊ शकते असा त्यांचा कोणताही संवेदनशील डेटा चोरीला गेला नाही. याशिवाय, कंपनी प्रभावित युजर्सना आवश्यक पावले उचलण्यास सांगत ईमेल पाठवत आहे.

प्रभावित युजर्सने त्वरित करावे हे काम

टेक कंपनीने युजर्सना त्यांच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये स्ट्रॉंग पासवर्ड वापरणे, खात्याबद्दल सतर्क राहणे आणि कोणत्याही संशयास्पद ॲक्टिव्हिटीची तक्रार करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. डेलने म्हटले आहे की ते आपल्या ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे आणि आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करतील.

Dell ने तयार केले सपोर्ट पेज

Dell ने एक सपोर्ट पेज देखील तयार केले आहे, जिथे ग्राहक अधिक माहिती मिळवू शकतात आणि तेथे त्यांना डेटा लीकशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Source link

data leakageDellhackersडेटा लिकेजडेलहॅकर्स
Comments (0)
Add Comment