हनुमान एआय चॅटबॉट इंग्रजी माहित नसलेल्या युजर्सच्या दृष्टीने डेव्हलप करण्यात आला आहे. म्हणून यात ११ स्थानिक भाषांचा सपोर्ट आहे. यात भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, पंजाबी, आसामी, तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि सिंधी या भाषांचा समावेश आहे.
अँड्रॉइड युजर्सना करता येईल डाउनलोड
हनुमान एआय चॅटबॉट अँड्रॉइड युजर्स गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात. हा चॅटबॉट अगदी मोफत उपलब्ध आहे. तसेच आयओएस युजर्ससाठी हा चॅटबॉट लवकरच अॅप स्टोरवर उपलब्ध होईल.
हनुमान चॅटबॉटचा उपयोग काय
हनुमान चॅटबॉट LLM मेथडवर काम करेल, ही स्पीच टू टेक्स्ट युजर फ्रेंडली सर्व्हिस म्हणता येईल. हा AI मॉडेल मोठ्या डेटामधून शिकून नैसर्गिक वाटणारा प्रतिसाद देतो. Open AI आणि Google Gemini AI ला टक्कर देण्यासाठी रिलायन्सनं ही एक चांगली सुरुवात केली आहे.
इतर AI मॉडेल येत आहेत लवकर
हनुमान चॅटबॉट आणि BharatGPT व्यतिरिक्त देशात इतर अनेक AI मॉडेल देखील डेव्हलप होत आहेत. ज्यात Sarvam आणि Krutrim सारख्या कंपन्या देखील AI मॉडेल डेव्हलप करत आहेत. जर हे सर्व AI मॉडेल वेळेवर लाँच झाले तर भारतीय युजर्सची Open AI आणि Gemini AI वर कमी अवलंबून राहतील.
याच्या माध्यमातून गव्हर्नस, मॉडेल हेल्थ, एज्युकेशन आणि फायनान्स सेक्टरला खूप फायदा होईल. त्याचबरोबर एक ऐतिहासिक क्षण असेल आणि कंपनीला BharatGPT डेव्हलप करणं सोपं जाईल. तसेच हनुमान चॅटबॉटच्या मदतीनं ज्या लोकांना इंग्रजी माहीत नाही ते स्थानिक भाषेत देखील ही टेक्नॉलॉजी वापरू शकतील.