प्रज्वल रेवण्णा व्हिडीओ प्रकरणी भाजप नेता अटकेत, संबंधित क्लिप लीक केल्याचा आरोप

वृत्तसंस्था, चित्रदुर्ग (कर्नाटक) : हासनचे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह सेक्स व्हिडीओ प्रसारित झाल्याप्रकरणी भाजपचे नेते आणि वकील जी. देवराजे गौडा यांना अटक करण्यात आली आहे. गौडा यांना गुलिहाल टोलगेट येथे हिरियूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यांना शनिवारी चौकशीसाठी होलेनरसीपुरा येथे नेण्यात आले.

पेन ड्राइव्हमधून व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हासन पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे देवराजे गौडा यांना अटक करण्यात आली. प्रज्वल रेवण्णाचे आक्षेपार्ह व्हिडीओ कर्नाटकातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात समोर आले होते.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू असलेले प्रज्वल रेवण्णा फरारी असून, त्यांच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. या प्रकरणात बलात्कार, विनयभंग, ब्लॅकमेलिंग, धमकावणे आदींबाबत प्रज्वल यांच्याविरोधात तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. संबंधित व्हिडीओ लीक केल्याचा आरोप देवराजे गौडा यांच्यावर आहे. मात्र, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. देवराजे यांनी २०२३मध्ये आमदार एच. डी. रेवण्णा यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. एच. डी. रेवण्णा प्रज्वलचे वडील असून, महिलेच्या अपहरणप्रकरणी तेदेखील तुरुंगात आहेत.
रेवण्णा व्हिडीओप्रकरणात कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप, ‘या’ बड्या नेत्याचं घेतलं नाव
‘सरकारला कोण रोखत आहे?’

नवी दिल्ली : लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी, जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा याचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करण्यापासून सरकारला कोण रोखत आहे, असा प्रश्न काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी शनिवारी केला. प्रज्वल रेवण्णा फरारी असून, सध्या जर्मनीत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी कर्नाटक महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहिले असून, कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रज्वलला पळून कसे काय जाऊ देण्यात आले, असा प्रश्न जयराम रमेश यांनी ‘एक्स’वरून केला.

Source link

bjpg devaraje gowdajdsprajwal revannaprajwal revanna obscene video case
Comments (0)
Add Comment