राहुल गांधी विरोधीपक्ष नेते नसून फक्त खासदार आहेत, चर्चेतून वाद घालण्याचा हेतू, भाजपची राहुल गांधीवर टीका

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेला सहमती दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी माजी न्यायाधीश मदन लोकूर, अजित शहा आणि पत्रकार एन. राम यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सार्वजनिक चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहिले होते. याच मुद्द्यावरून भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधी फक्त खासदार आहेत –

राहुल गांधींनी मोदी यांच्याशी चर्चेला सहमती दर्शवल्यानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” राहुल गांधी हे फक्त खासदार आहेत, ते विरोधी पक्ष नेते नाहीत. त्यामुळे त्यांचा फक्त भाजपबरोबर वाद घालण्याचा हेतू आहे.
PM Narendra Modi: पाक अणुबॉम्बही हाताळू शकत नाही, पंतप्रधान मोदींची ओडिशामध्ये कॉंग्रेसवर टीका

मोदी, राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात काय?

जनता चिंतेत आहे कारण, दोन्ही बाजूंनी (एनडीए आणि इंडिया) ने केवळ एकमेकांवर आरोप करून आव्हाने दिली आहेत. परंतु यातून कोणतेही साधक-बाधक उत्तर मिळालेले नाही. भारत सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असल्याने संपूर्ण जगाचे आपल्या देशातील निवडणुकांवर लक्ष आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे व्यासपीठावर येऊन चर्चा करायला हवी.” असं पत्रात लिहिलं आहे.
BJPचे सरकार आले तर उद्धव ठाकरेंसह अनेक नेते जेलमध्ये जातील, अरविंद केजरीवालांचा मोठा दावा

पंतप्रधान तयार झाले की आम्ही लगेच चर्चा करू –

राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्राला त्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ”पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करण्यासाठी मी तयार आहे. यामुळे लोकांना आमच्या विकासाचा दृष्टिकोन कळू शकेल. निवडणूक लढवणाऱ्या पक्षांचे व्हिजन थेट जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. मला किंवा काँग्रेस अध्यक्षांना अशा चर्चेत सहभागी होण्यास नक्की आनंद होईल.जेव्हा पंतप्रधान तयार होतील तेव्हा आम्ही लगेच चर्चा करू.”

Source link

debatenarendramodinewdelhiPoliticsrahulgandhiकॉंग्रेसभाजपाभारतराजकारणलोकसभा
Comments (0)
Add Comment