Ganga Saptami 2024 : गंगा सप्तमी कधी? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व वाचा एका क्लिकवर

Ganga Saptami 2024 Shubh Muhurta :

प्रत्येक धार्मिक कार्यात गंगाजल ला पवित्र मानले जाते. अनेक सण आणि उत्सवात गंगेशी याचा थेट संबंध येतो. गंगा ही हिंदूंच्या श्रद्धेचे स्थान मानले जाते. धार्मिक ग्रंथात गंगा नदीला अधिक महत्त्व आहे.

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील सातव्या दिवशी गंगा सप्तमी साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार या दिवशी गंगाचा जन्म दिवस झाला होता असे मानले जाते.
Budh Gochar 2024 : मेष राशीत बुध ग्रहाचे संक्रमण! ५ राशींच्या करिअरचे टाळे खुलणार, आर्थिक क्षेत्रात प्रगती
असे म्हटले जाते की, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमीला ब्रह्म देवाच्या कमंडलुतून गंगा देवीचा जन्म झाला होता. यंदा ही गंगा जयंती १४ मे ला साजरी केली जाणार आहे. तसेच यावर्षी गंगा जयंतीला ज्येष्ठ संक्रांतीचा शुभ योग जुळून आला आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी ग्रहांची विशेष हालचाल देखील होणार आहे. या काळात सूर्य ग्रह वृषभ राशीत संक्रमण करणार आहे त्यामुळे सूर्य-गुरु युती तयार होईल. अशी मान्यता आहे की, या दिवशी दान धर्म केल्याने अक्षय्य तृतीयासारखे फल प्राप्ती होते.

गंगा सप्तमी ही गंगा जयंती म्हणून साजरी केली जाते. तसेच या दिवशी गंगा नदीच्या काठावर अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गंगा जयंतीनिमित्त घरी गंगा पूजा करणे देखील शुभ मानले जाते. जाणून घेऊया यंदा गंगा जयंतीचा शुभ मुहूर्त कधी आहे त्याविषयी

1. गंगा सप्तमी कधी?

हिंदू पंचांगानुसार गंगा सप्तमीची सुरुवात १३ मे ला संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी होईल तर दुसऱ्या दिवशी १४ मे २०२४ ला संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार गंगा सप्तमी ही १४ मे ला साजरी केली जाणार आहे.

2. गंगा सप्तमी पूजा पद्धत

  • गंगा सप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • घरात गंगा देवीचे चित्र किंवा फोटो लावून त्याची पूजा करा, हार व फुले अर्पण करा.
  • या दिवशी गंगा देवीची आरती करा तसेच दीपदान देखील करा.
  • या काळात सहस्त्रनाम स्त्रोत आणि गायत्री मंत्राचा जप करणे अंत्यत शुभ मानले जाते.
  • या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करु नये. गंगा नदीत स्नान करणे अतिशय विशेष ठरते.
  • तसेच आंघोळ करताना पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा.

3. पौराणिक कथा

धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णुच्या पायांतील घामाच्या थेंबातून गंगा देवीचा जन्म झाला असे म्हटले जाते. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूचे पाय धुवून ते पाणी आपल्या कमंडलूत भरले त्यानंतर गंगा देवीची जन्म झाला असे म्हटले जाते. त्या दिवशी वैशाख शुक्ल सप्तमी होती. त्यामुळे दरवर्षी गंगा जयंती साजरी केली जाते.

Source link

ganga saptami 2024ganga saptami dateganga saptami timeगंगा जयंतीगंगा सप्तमी
Comments (0)
Add Comment