जर तुमच्या घरात वाय-फाय राउटर असेल तर तुम्हाला माहित आहे का की तो वाय-फाय राउटर कोणत्या ब्रँडचा आहे. साधारणतः लोकल इंटरनेट प्रोव्हायडर खर्च कमी करण्याच्या नादात कोणताही वाय-फाय राउटर ग्राहकांना देतात. परंतु हीच चूक महागात पडू शकते, कारण सरकारी संस्था कंप्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजे CERT-In नं Digisol Wifi राउटर बद्दल एक चेतावणी जारी केली आहे. सिक्योरिटी रिसर्चरनं दावा केला आहे की वाय-फाय राउटर तुमची संवेदनशील माहिती चोरू शकतो. चला जाणून घेऊया याबाबत.
कोणत्या मॉडेलमध्ये आहेत त्रुटी
सापडलेल्या त्रुटी
कमकुवत पासवर्ड पॉलिसी
असुरक्षित अॅक्सेस पॉईंट
पासवर्ड स्टोरेज
सुरक्षित राहण्यासाठी करा पुढील उपाय
कोणत्या मॉडेलमध्ये आहेत त्रुटी
CERT-In च्या अॅडव्हायजरी नुसार, ज्या वाय-फाय राउटरमध्ये त्रुटी वाढली आहे तो Digisol Router DG-GR1321 सह हार्डवेयर व्हर्जन 3.7L आणि फर्मवेअर व्हर्जन V3.2.02 चा समावेश आहे. जर तुमच्याकडे हा ठराविक मॉडेल असेल तर त्वरित अॅक्शन घेतली पाहिजे.
सापडलेल्या त्रुटी
कमकुवत पासवर्ड पॉलिसी
हॅकर्स सिक्योरिटी बायपास करून तुमच्या पासवर्डचा अॅक्सेस मिळवू शकतात, हे कमकुवत पासवर्ड ठेवल्यामुळे होत आहे.
असुरक्षित अॅक्सेस पॉईंट
काही डिजिसोल मॉडेलमध्ये बिल्ट इन अॅक्सेस पॉईंट दिले जातात, जे युजर्सना थेट केबलशी कम्यूनिकेशनचा अॅक्सेस देतात.
पासवर्ड स्टोरेज
तसेच सिक्योरिटी मधील त्रुटींमुळे डिव्हाइसमध्ये इन्क्रिप्टेड पासवर्डची स्टोरेज मिळते. त्यानंतर तुमचा डिवाइस कट्रोल करून फ्रॉड केला जातो.
सुरक्षित राहण्यासाठी करा पुढील उपाय
तुमचा Digisol Wi-Fi router सुरक्षतरीत्या वापरण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- फर्मवेअर अपडेट करा: नवीन फर्मवेअरवर तुमचा राउटर अपडेट करणं ही सर्वात महत्वाची स्टेप आहे. अपडेटमध्ये सिक्योरिटी पॅचेस असतात ज्यात या समस्या सोडलेल्या असतात. यासाठी तुम्हाला डीजीसोलच्या वेबसाइटवर जावं लागेल आणि राउटर मॉडेलनुसार नवीन फर्मवेअर डाउनलोड करावं लागेल.
- वाय-फाय पासवर्ड बदला: फर्मवेअर अपडेट केल्यावर वाय-फाय पासवर्ड बदला. एखादा मजबूत पासवर्ड ठेवा, ज्यात १२ कॅरेक्टर असतील, अप्पर केस आणि लोवर केस अक्षरे, अंक आणि चिन्हांचा समावेश असेल.
- रिमोट अॅक्सेस बंद करा: काही राऊटर्समध्ये रिमोट अॅक्सेस फिचर अस्त त्यामुळे नेटवर्क सेटिंग कुठूनही बदलता येते. जर तुमच्याकडे डीजीसोल राउटर असेल तर हर फिचर बंद केलेलं केव्हाही उत्तम.
- राउटर बदला: जर तुम्हाला फर्मवेअर अपडेट करता येत नसेल किंवा अपडेटमध्ये वरील त्रुटी पॅच केल्या नसतील तर तुम्ही नवीन अधिक सुरक्षित राउटर खरेदी करू शकता.