Vastu Tips : नोकरीत अपयश, सतत पैशांची चणचण भासते? वास्तुशास्त्रानुसार हा उपाय करुन पाहा, नशिबाचे दार उघडेलच!

Vastu Tips :

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. यामध्ये घरातील दिशेपासून कोणता रंग असायला हवा याविषयी देखील सांगितले जाते. पण तुम्हाला माहित वास्तुशास्त्रात असे काही नियम सांगितले आहे की, ज्यामुळे तुमचं नशिब पालटेल.

यामध्ये फुलांशी संबंध जोडण्यात आला आहे. फुल ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतिक मानले जातात. जर तुम्हाला सतत अडचणींचा किंवा आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर जास्वंदीच्या फुलाचा या पद्धतीने वापर करा.
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो लावणं शुभ की, अशुभ? वाचा एका क्लिकवर
वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीला जास्वंदीचे फूल अर्पण केल्याने आर्थिक समस्यांपासून सुटका होते. धन-धान्यात वाढ देखील होते. तसेच घरात विशिष्ट प्रकाराची सकारात्मक झाडे लावल्याने ग्रह बलवान होतात. ज्यामुळे पैशांची चणचण कमी होते.

जर तुमच्या कुंडलीत सूर्य कमजोर असेल तर तुम्ही घरात जास्वंदीचे रोपटे लावायला हवे. ज्यामुळे सूर्य अधिक बलवान होऊन पैशांची कमतरता कमी होईल. तसेच वडिलांसोबतचे नाते देखील सुधारते. मान-सन्मानात वाढ होते.
Budh Gochar 2024 : मेष राशीत बुध ग्रहाचे संक्रमण! ५ राशींच्या करिअरचे टाळे खुलणार, आर्थिक क्षेत्रात प्रगती
जास्वंदीचे फुल हे श्रीगणेशाला ही अतिशय प्रिय आहे. या फुलाचा आरोग्यासाठी देखील अधिक फायदा होतो. केसांच्या वाढीपासून कोंड्यांपर्यंत जास्वंदीचे फुल बहुगुणी ठरते. परंतु, वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या फुलाचे अनेक फायदे सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. कर्जमुक्ती

जर तुमच्यावर सतत कर्जाचा डोंगर असेल आणि कर्जमुक्तीपासून सुटका हवी असल्यास हा उपाय करुन पाहा. शुक्रवारी श्रीगणेश आणि दुर्गा देवीचे ध्यान केल्यानंतर पाच जास्वंदीची फुले आपल्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असे ७ दिवस नियमित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच कर्जापासून मुक्ती मिळते.
Ganga Saptami 2024 : गंगा सप्तमी कधी? शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व वाचा एका क्लिकवर

2. आर्थिक चणचण

जर तुमच्या घरात सतत पैशांची चणचण भासत असेल तर तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा वापर करायला हवा. सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर त्याला जास्वंदीचे फुल अर्पण करा. यासाठी जास्वंदीचे तांब्याच्या कळसमध्ये ठेवून ते पाणी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून द्यावे. यामुळे पैशांची कमतरता भासणार नाही.

3. घरातील सुख शांती

तुमच्या घराच्या अंगणात जास्वंदीचे रोपटे लावा ज्यामुळे सकारात्मकता टिकून राहिलं. तसेच रोपटे लावताना घरातील दिशा देखील तपासा. हे रोपटे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे. यामुळे तुमच्या घरात सकारात्मकता निर्माण होते. रोपटे सुकणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

4. वैवाहिक नाते संबंध

पती-पत्नीमध्ये सतत भांडणे होत असतील तर जास्वंदीचे फुल फायदेशीर ठरेल. वास्तुशास्त्रानुसार जर उशीखाली जास्वंदीचे फूल ठेवून झोपल्याने वैवाहिक नाते संबंध सुधारतात.

5. नोकरीत यश

जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात यश मिळत नसेल. कामात प्रगती हवी असेल तर देवी लक्ष्मीला जास्वंदीच्या फुलांसह साखरेचा प्रसाद अर्पण करावा. यामुळे देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहिलं. तसेच प्रगतीमधली अडथळे दूर होतील.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

hibiscus Flowerhome remediesVastu DirectionVastu RulesVastu Tipsवास्तु टिप्सवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment