भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडे असे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत ज्यात ग्राहकांना 30 दिवसांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सुविधा मिळते. अनेक फायदे देणारा असा हा प्लॅन आहे. सिम ॲक्टिव्ह ठेवू शकणारा आणि ज्यांना कमी किमतीत प्लान हवा आहे, अशा लोकांसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरेल. जर तुम्ही सेकंडरी सिम कार्डसाठी प्लॅन हवा असेल त्यांना BSNL एक सुवर्ण संधी देत आहे. या रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देत आहोत.
199 रुपयांमध्ये डेटा कॉलिंग आणि बरेच काही
BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सुविधा देण्यात आली आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅनची व्हॅलिडिटी 30 दिवसांची आहे. यामुळे एकूण 60 जीबी डेटाचा फायदा मिळतो. ग्राहक एका दिवसात 100 एसएमएस पाठवू शकतात. कंपनीचा हा प्लॅन प्रीपेड ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याशिवाय बीएसएनएलचे इतरही अनेक प्लॅन लोकप्रिय आहेत.
सेकंडरी सिम म्हणून वापरणाऱ्यांसाठी सर्वोत्तम प्लॅन
बीएसएनएलचा हा प्लॅन विशेषत: बीएसएनएल सिम सेकंडरी सिम म्हणून वापरणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ऑफर करण्यात आला आहे. सिम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त 199 रुपये खर्च करावे लागतील आणि तुम्ही महिनाभर टेन्शन फ्री असाल. यामध्ये डेटा आणि कॉलिंगसह इतर अनेक फायदे देखील उपलब्ध आहेत.
एअरटेल, रिलायन्स आणि जिओचा देखील 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
बीएसएनएल व्यतिरिक्त, एअरटेल, रिलायन्स आणि जिओ देखील 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. परंतु, त्यांची व्हॅलिडिटी 30 दिवसांपेक्षा कमी आहे. जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 1.5 डेटा मिळतो. यामध्ये कॉलिंग आणि एसएमएस सुविधाही उपलब्ध आहेत.
एअरटेलच्या प्लॅनची व्हॅलिडिटी ३० दिवस आहे. पण डेटा फक्त 3 GB आहे. यामध्ये दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात.