Google Cloud सह Airtel ग्राहकांना मिळणार क्लाउड सोल्यूशन्स; कंपन्यांनी केली भागीदारी

Airtel ग्राहकांना आता Google Cloud सह क्लाउड सोल्यूशन मिळेल, Airtel आणि Google दोन्ही कंपन्यांनी भागीदारी केली आहे. ही भागीदारी AI तंत्रज्ञानासह उद्योगातील आघाडीची AI/ML सोल्यूशन्स डेव्हलप करण्यात मदत करेल.

एअरटेल ग्राहकांना मिळणार क्लाउड सोल्यूशन्स

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या ताज्या अहवालानुसार, एअरटेल ग्राहकांना या भागीदारीसह Google क्लाउड ते फास्ट ट्रॅक क्लाउड ॲडॉप्शनपर्यंत क्लाउड सोल्यूशन्स मिळतील.

दोन्ही कंपन्या मिळून चांगले काम करतील

एकत्र काम केल्याने या दोन कंपन्या कनेक्टिव्हिटी आणि एआय तंत्रज्ञानावर अधिक चांगले काम करतील.
ही भागीदारी AI तंत्रज्ञानासह उद्योगातील आघाडीची AI/ML सोल्यूशन्स डेव्हलप करण्यात मदत करेल.
दोन्ही कंपन्या गुगल क्लाउडच्या एआय तंत्रज्ञानासह एअरटेलच्या कनेक्टिव्हिटी आणि मार्केटिंग चॅनेलचा फायदा घेऊन एकत्रितपणे बाजारात काम करतील.

एअरटेल ग्राहकांना मिळेल क्लाउड मॅनेजमेंट सर्व्हिस

एअरटेल आपल्या ग्राहकांना क्लाउड मॅनेजमेंट सर्व्हिस देण्यासाठी काम करेल. यामध्ये मोठे उद्योग आणि उदयोन्मुख व्यवसाय या दोन्हींचा समावेश असेल.ही भागीदारी मार्केटिंग टेक्नॉलॉजी सोल्यूशन्ससह ग्राहकांचे बिहेव्हियर पॅटर्न समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल. हे कमी खर्चात चांगल्या जाहिराती तयार करण्यात देखील मदत करेल.

भारती एअरटेलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केला आनंद

भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल यांनी गुगल क्लाउडसोबतच्या या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त केला.या भागीदारीवर ते म्हणाले की, “Google क्लाउडसोबतच्या या भागीदारीबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे.सरकार, उद्योग आणि उदयोन्मुख व्यवसायांसाठी सुरक्षित क्लाउड सोल्यूशन म्हणून ही भागीदारी विशेष असेल”.

भारती एअरटेलने सुरु केले पुण्यात सर्व्हिस स्टेशन

भारती एअरटेलने यासाठी पुण्यात सेवा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात 300 हून अधिक तज्ञांना Google क्लाउड आणि डिजिटल सेवांसाठी प्रशिक्षण दिले जाईल.

Source link

Airtelcloud solutionsgoogleएअरटेलक्लाउड सोल्यूशनगुगल
Comments (0)
Add Comment