स्क्रीनशॉट घेतल्यावर देईल सूचना
सध्या हे फीचर व्हॉट्सॲपने iOS युजर्ससाठी उपलब्ध करून दिले आहे. WABetaInfo या व्हॉट्सॲप अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या वेबसाइटनुसार, नवीन फीचर आणल्यावर, जर एखाद्याला तुमच्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट कोणाला तरी घ्यायचा आहे हे विचारणारी सूचना मिळेल. अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीला ब्लॉक करू शकता. तसेच, प्रोफाइल फोटो सर्व युजर्सला दिसू नये म्हणून तुम्ही सेटिंग्जमध्ये बदल करू शकता.
तरी अजूनही धोका टळलेला नाही
कंपनीचे म्हणणे आहे की व्हॉट्सॲपचे नवीन फीचर सुरक्षेच्या दृष्टीने खूप प्रभावी ठरेल आणि यामुळे युजर्सच्या फोटोंचा गैरवापरही टळेल. सध्या हे फिचर डेव्हलपमेंट टप्प्यात आहे. तथापि, चिंता अजूनही कायम आहे, कारण स्क्रीनशॉट घेणे प्रतिबंधित करूनही, कोणी दुसऱ्या फोनवरून फोटो क्लिक करू शकतो. अशाप्रकारे फोटोंचाही गैरवापर होऊ शकतो, त्यासाठी व्हॉट्सॲपला काम करावे लागेल.
Whatsappने लाँच केले इतर फिचर्स
व्हॉट्सॲपच्या नवीन डिझाइनमध्ये वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि सोपा इंटरफेस मिळणार आहे. मात्र, यावेळीही कंपनीने अधिकतर हिरवा रंग वापरला आहे.
व्हॉट्सॲपने आपल्या नवीन अपडेटमध्ये डार्क मोडमध्येही बदल केले आहेत. आता त्याचा डार्क मोड पूर्वीपेक्षा गडद झाला आहे, ज्यामुळे कंटेंट वाचणे सोपे होईल.
डिझाईन अपडेट करण्यासोबतच व्हॉट्सॲपने आयकॉन आणि ॲनिमेशनही जोडले आहेत. ॲनिमेशन जोडल्याने युजर्सना एक नवीन अनुभव मिळेल.