Sushil Kumar Modi Passes Away: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन

नवी दिल्ली: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले. वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी लढत होते. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी एक्सवर त्यांच्या निधनाची बातमी दिली.
पाच जानेवारी १९५२ रोजी पाटणा येथे जन्मलेल्या मोदी यांचे शिक्षण त्याच शहरात झाले. मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. १९९० साली ते सक्रीय राजकारणात आले. १९९० १९९५ आणि २००० साली ते बिहार विधानसभेवर निवडूण गेले. २००४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भागलपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र एका वर्षातच त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा बिहारच्या राजकारणात परतले. २००५ ते २०१३ या काळात ते नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते.

१९९६ ते २००४ पर्यंत ते विधानसभेत विरोधीपक्ष नेते होते. मोदी यांनी पाटणा उच्च न्यायालयात लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेनंतर चारा घोटाळा समोर आला.

Source link

former bihar deputy cm sushil kumar modisushil kumar modisushil kumar modi passes awayबिहारबिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदीसुशील कुमार मोदी
Comments (0)
Add Comment