ग्राहकांनी ठरवलं ‘या’ आगामी फोनचं नाव; नोकिया सारख्या मजबूत बिल्डसह येतोय भारतात

HMD भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी तयार आहे. नवीन फोनचे नाव ठरवण्यासाठी कंपनीनं अनोखी पद्धत वापरली होती. HMD नं एक कॉन्टेस्ट सुरु केला ज्याचे नाव #HMDNameOurSmartphone होते. या कॉन्टेस्टमध्ये सहभागी झालेल्या युजर्सनी भारतात कंपनीच्या नवीन स्मार्टफोनसाठी अनेक नावे सुचवली. त्यानंतर आता स्मार्टफोन निर्माता कंपनीनं भारतात लाँच होणाऱ्या आपल्या नवीन स्मार्टफोनच्या नावाचा खुलासा केला आहे.

HMD Arrow

एचएमडी ग्लोबलचा नवीन फोन भारतात HMD Arrow नावाने येईल. कंपनी सध्या वेगवेगळ्या मार्केट्समध्ये वेगवेगळ्या नावाने स्मार्टफोन लाँच करत आहे. युजर्सनी देखील भारतीय व्हेरिएंटसाठी हटके नावे सुचवली होती, ज्यात Indhumanoid, Manbha, Naruto, Brahmos सारखे नावांचा समावेश होता. परंतु अखेरीस HMD Arrow फायनल करण्यात आलं. कंपनीनं अलीकडेच युरोपमध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन HMD Pulse नावाने लाँच करण्यात आला आहे.

Nokia 3210 आठवतोय का? पुन्हा नव्याने बाजारात आलाय आठवणीतला कीपॅड असलेला फोन

HMD Arrow बाबत चर्चा आहे की हा फोन HMD Pulse च्या स्पेसिफिकेशन्ससह बाजारात येईल. परंतु Arrow नाव फक्त भारतात ठेवलं जाईल. म्हणजे या नावाने हा फोन इतर कोणत्याही बाजारपेठांमध्ये लाँच केला जाणार नाही. त्यामुळे HMD Arrow चे स्पेसिफिकेशन्स आपल्याला माहिती आहेत असं म्हणूया. HMD Arrow एक एंट्री लेव्हल स्मार्टफोनच्या स्वरूपात सादर केला जाऊ शकतो. यात 6.65 इंचाचा IPS डिस्प्ले पॅनल मिळू शकतो ज्यात 90Hz रिफ्रेश रेट असेल. स्क्रीनवर पंच होल डिजाइनसह नॉच मिळू शकते. फोनमध्ये microSD कार्ड स्लॉट देखील दिला जाईल. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये Unisoc T606 चिपसेट असेल.

फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह बेस व्हेरिएंट असेल. तसेच 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज चा आणखी एक अन्य व्हेरिएंट देखील सादर केला जाऊ शकतो. हा सिंगल कॅमेऱ्यासह येईल. म्हणजे मागे 13 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल जसे की Pulse मध्ये मिळतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असेल त्याचबरोबर 10W चा चार्जर असेल. तसेच डिव्हाइसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील दिला जाऊ शकतो.

Source link

hmd arrowhmd arrow in indiahmd arrow smartphonehmd arrow specificationsएचएमडीएचएमडी ग्लोबल
Comments (0)
Add Comment