Surya Gochar 2024 : सूर्याचे वृषभ राशीत संक्रमण! या ४ राशींना लागणार लॉटरी; वाचा १२ राशींचे राशीफल

Surya Gochar Horoscope 2024 :
गंगा सप्तमीच्या शुभ योगावर सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा वृषभ राशीत संध्याकाळी ५.४६ मिनिटांनी प्रवेश होणार आहे. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला संक्रांती असे म्हटले जाते.
ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह त्याचा कालावधीनंतर दुसऱ्या ग्रहात प्रवेश करत असतो. ज्यामुळे त्याचा प्रभाव इतर राशींवर पडतो. १४ मे ला सूर्य ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे आज वृषभ संक्रांती असणार आहे. हे संक्रमण कोणत्या राशींना फायदा देईल जाणून घेऊया

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी ही वेळ लाभदायक ठरणार आहे. लवकरच उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नापेक्षा जास्त कमावल्याने आनंदी राहाल. कुटुंबाकडून निराशेचा सामना करावा लागेल. पालकांशी काही मुद्दयावरुन वाद होऊ शकतो.मन उदास राहिल. करिअरसाठी हा काळ चांगला ठरेल. सहकाऱ्याशी वाद होऊ शकतात.

वृषभ

सूर्याच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना अनेक नवीन कामे मिळू शकतात. करिअरला गती मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अनेक कामे मिळतील. संयम राखणे अधिक गरजेचा आहे. नोकरी बदलण्याची संधी मिळेल. प्रयत्न केल्यास आवडीचे काम मिळेल. घरातून अडचणी येऊ शकतात.

मिथुन

हे संक्रमण मिथुन राशीसाठी संमिश्र राहिल. करिअरमधील योजना यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी गोंधळाला सामोरे जावे लागू शकते. भावंडांकडून निराशेचा सामना करावा लागतो. गैरसमजामुळे भाऊ-बहिणीसोबत वाद होतील. कामामुळे लांबचा प्रवास होऊ शकतो.

कर्क

कर्क राशीसाठी मित्र आणि कुटुंबीयांना भेटण्याची ही वेळ असेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग घेऊ शकता. दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. पदोन्नती होईल. दीर्घकाळ रखडलेल्या व्यावसायिक योजना यशस्वी होतील. गुंतवणुकीचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक समृद्धी मिळेल. पैशांची बचत होईल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना या संक्रमणामुळे फायदा होईल. स्वप्न लवकरच पूर्ण होतील. लवकरच नवीन नोकरी मिळेल. व्यवसायात यश मिळेल. करिअरमध्ये स्थिरता येईल. कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध येतील. वडिलांशी असलेले संबंध अधिक सुधारतील.

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ धार्मिक प्रवासाच्या नावावर असेल. अध्यात्मिक गोष्टीकडे अधिक वळाल. धार्मिक कार्यक्रम आयोजित कराल. नोकरदार लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. व्यवसायामुळे परदेशी जाण्याची संधी मिळेल. भविष्यात चांगले परिणाम पाहायला मिळतील.

तुळ

करिअरबाबतील निर्णय घेताना अडचणी येतील. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबाशी संबंध सुधारतील. मित्र-मैत्रिणींशी अधिक जुळवून घ्याल. लवकरच नवीन प्रोजेक्टवर काम कराल.

वृश्चिक

रागावर नियंत्रण ठेवा त्यामुळे नुकसान होऊ शकते. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला असेल. उत्पन्नापेक्षा जास्त कमाई करण्याचा प्रयत्न कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करत असाल तर फायदा होईल. जोडीदारासोबत संवाद करुन भांडण मिटवा.

धनु

धनु राशीच्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. कामामुळे तुमचा आदर वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. सावध राहा. कुटुंबातील संबंध सुधारतील.

मकर

मकर राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच नवीन नोकरी मिळेल. कामाच्या ठिकाणी बॉससोबत संबंध बिघडतील. त्यामुळे कामावर परिणाम होईल. आर्थिक बाबतीत अस्थिरतेचा सामना करावा लागेल. मोठी गुंतवणूक करणे टाळा.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये यश मिळविण्याचा हा काळ आहे. कामाबद्दल कौतुक होईल. स्वत:ला सिद्ध करावे लागेल. व्यवसायात फायदा होईल. रखडलेले पैसे मिळतील.

मीन

मेहनतीचे फळ मिळणार नाही. व्यवसायात मोठी गुंतवणूक करणे टाळा. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुर्तास पुढे ढकला. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. कौटुंबिक बाबतीत संयमाने पुढे जा.

Source link

Career Horoscopemoney horoscoperashi bhavishya in marathiSurya Gochar 2024Vrishabha RashiZodiac sign
Comments (0)
Add Comment