Tuesday Astrology : मंगळवारी हनुमानाला करा या गोष्टी दान, विवाहातील अडचणी होतील दूर

Mangalwar Che Upay :

हिंदू धर्मानुसार प्रत्येक वाराचे विशेष असे महत्त्व आहे. तो त्यानुसार प्रत्येक देवाला अर्पण केला गेला आहे. मंगळवार हा दिवस हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी हनुमानाची पूजा करुन मंगळवारी व्रत केल्याने मनुष्याला भगवंताची कृपा प्राप्त होते.

जर तुमच्या कुंडलीत १,२, ४ किंवा १२ व्या स्थानात मंगळ ग्रह असेल तर त्या स्थितीला नीच मंगल दोष असे म्हणतात. तसेच जर मंगळ ७ व्या किंवा ८ व्या ग्रहात असेल तर त्याला श्रेष्ठ मंगळ दोष असे म्हटले जाते. कुंडलीतील मंगळ ग्रह अधिक बलवान असेल तर लग्न जुळण्यास अडचण, पैशांची चणचण,
आरोग्याविषयीच्या समस्या सतत उभ्या राहातात. जर तुमच्याही कुंडलीत मंगळ दोष असेल आणि वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर काही सोपे उपाय करुन पाहा.
Mohini Ekadashi 2024 : भगवान विष्णूला ही ४ फुले अतिशय प्रिय; मोहिनी एकादशीला करा अर्पण, होतील अनेक मनोकामना पूर्ण
मंगळवारी काही वस्तूंचे दान केल्याने वैवाहिक जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. यामुळे व्यक्तीचा त्रास आणि दु:ख दूर होते.जर तुमच्या कुंडलीतील मंगळ अधिक शक्तीशाली असेल तर काही उपाय केल्याने त्याच बळ कमी होईल. जाणून घेऊया या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करायला हवे.

या गोष्टी करा दान

1. हनुमानाला लाडू अतिशय प्रिय आहेत. दर मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर प्रसाद म्हणून लाडू अर्पण करा. यानंतर तो प्रसाद म्हणून वाटा. ज्योतिषशास्त्रानुसार नैवेद्यात लाडूचा समावेश केल्याने हनुमानाचा आशिर्वाद मिळतो. तसेच आर्थिक उत्पन्न देखील वाढते.

2. मंगळवारी मसूर डाळीचे दान करावे. असे केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष दूर होतो. तसेच वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात.

3. सतत पैशांची चणचण भासत असेल तर हे संकट दूर करण्यासाठी दलिया आणि तांदूळ दान करा. यामुळे कर्जमुक्ती किंवा पैशांच्या चणचणीपासून सुटका होईल.
Vastu Tips : नोकरीत अपयश, सतत पैशांची चणचण भासते? वास्तुशास्त्रानुसार हा उपाय करुन पाहा, नशिबाचे दार उघडेलच!
4. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी नारळ दान करणे चांगले मानले जाते. यामुळे आरोग्याच्या समस्यांपासून सुटका होते. याशिवाय गुळाचे देखील दान करावे.
मंगळवारी तुपाचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात. त्याच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येते.

5. दर मंगळवारी लाल रंगाच्या वस्तू दान करा. ज्यामध्ये मसूर डाळ, लाल रंगाची मिठाई, लाल रंगाचे कपडे हे पदार्थ दान करा. हनुमानाची पूजा करताना स्नान केलेले असावे. यावेळी हनुमान चालिसाचे पठण करा. तसेच हनुमानजींच्या चरणी सिंदूर अर्पण केल्याने कुंडलीतील मंगळ दोष दूर होण्यास मदत होते.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

astrologyLord HanumanMangal DoshMangal In KundaliMarriage LifeTuesday Astrology
Comments (0)
Add Comment