Samsung च्या 5G फोन्सवर जबरदस्त ऑफर, 12 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरीजच्या फोन्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हाला देखील बजेट सेगमेंटमध्ये दमदार फीचर असलेला फोन हव असेल तर गॅलेक्सी एफ सीरीजचे डिवाइस तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. विशेष म्हणजे फ्लिपकार्टच्याच्या डीलमध्ये तुम्ही या सीरीजचे तीन दमदार फोन बंपर डिस्काउंटसह विकत घेऊ शकता. ऑफरमध्ये मिळणाऱ्या सर्वात स्वस्त फोनची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी झाली आहे. रुये पकमी झाली आहे. डील मध्ये या फोनवर बँक ऑफर आणि शानदार कॅशबॅक देखील दिला जात आहे. तसेच तुम्ही हे फोन्स आकर्षक एक्सचेंज डीलमध्ये विकत घेऊ शकता. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारा डिस्काउंट तुमच्या जुन्या फोन च्या कंडीशन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल.

Samsung Galaxy F14 5G

6जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असेलेल्या या फोनची किंमत 11,990 रुपये आहे. सेलमध्ये फोन खरेदीसाठी जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत 11 हजार रुपयांनी आणखी कमी करता येते. फीचर्स पाहता, या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. याचा मेन कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये तुम्हाला 6000mAh ची बॅटरी मिळेल.
आता Samsung चा १२जीबी रॅम असलेला फोन येतोय; वनप्लसची झोप उडवणार का Galaxy F55 5G

Samsung Galaxy F34 5G F15 5G

फोनच्या 4GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. सेलमध्ये तुम्ही हा 1 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. या डिस्काउंटसाठी तुम्हाला HDFC बँक कार्डने ईएमआय ट्रँजॅक्शन करावं लागेल. फोन खरेदीसाठी जर तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डचा वापर केला तर तुम्हाला 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील मिळेल. फीचर्स पाहता, कंपनी या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देत आहे. याचा मेन कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. फोनची बॅटरी 6000mAh ची आहे. हा फोन मीडियाटेक डाइमेंसिटी 6100+ प्रोसेसरवर चालतो.

Samsung Galaxy F34 5G

डील मध्ये सॅमसंगचा हा फोन 12,999 रुपयांना मिळत आहे. सोबत 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनवर 5 टक्के कॅशबॅक देखील दिला जात आहे. या कॅशबॅकसाठी तुम्हाला फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डनं पेमेंट करावं लागेल. कंपनी या फोनवर 10,100 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. फीचर्स पाहता या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. याचा मेन कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. याची बॅटरी 6000mAh ची आहे.

Source link

samsungsamsung galaxy f seriessamsung galaxy f14 5gSamsung Galaxy F15 5Gsamsung galaxy f34 5gsamsung galaxy f55samsung new smartphone
Comments (0)
Add Comment