रिटेलर्सच्या बंदीनंतर OnePlus नं केली ‘या’ कंपनी सोबत भागेदारी, 63 हजारांपेक्षा जास्त स्टोर्सवर होणार विक्री

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus नं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या JioMart Digital सोबत भागेदारीची घोषणा केली आहे. त्यामुळे देशातील रिटेलमध्ये देखील OnePlus ला सहज वाटचाल करता येईल. या पार्टनरशिपमुळे देशातील 2 हजारांपेक्षा जास्त शहर आणि वस्त्यांमध्ये OnePlus चे प्रोडक्ट्स उपलब्ध होतील.

काही दिवसांपूर्वी अनेक रिटेल चेन्सनी कमी प्रॉफिट मार्जिन आणि क्लेम प्रोसेसिंगमधील हलगर्जीपणा अशी कारणे देऊन OnePlus प्रोडक्ट्सची विक्री बंद करण्याची चेतावणी दिली होती. JioMart Digital कडे 63 हजारांपेक्षा जास्त रिटेल स्टोर्सचं डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आहे. या पार्टनरशिपमुळे OnePlus चे स्मार्टफोन्स, वियरेबल्स आणि अन्य प्रोडक्ट्स या रिटेल स्टोर्सवर विकले जातील. कंपनीचे डिवाइस JioMart स्टोरच्या माध्यमातून ऑनलाइन देखील खरेदी करता येतील.
वनप्लसचा स्वस्त आणि मस्त फोन होणार अपग्रेड, रेडमी-रियलमीचा संपणार का खेळ?

अलीकडेच ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनमधील अनेक ऑफलाइन रिटेलर्स आणि साउथ इंडियन ऑर्गनाइज्ड रिटेलर्स असोसिएशननं म्हटलं होतं की 1 मेपासून OnePlus प्रोडक्ट्सच्या विक्रीवर बंदी घातली जाईल. या रिटेलर्सनी कंपनी वर कमी प्रॉफिट मार्जिन आणि क्लेमच्या प्रोसेसिंग मध्ये उशीर करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर कंपनीनं म्हटलं होतं की ते रिटेलर्सच्या समस्येवर तोडगा काढत आहेत.

वनप्लस नॉर्ड सीई 4 लाइट येतोय बाजारात

OnePlus Nord CE 4 Lite लवकरच बाजारात येऊ शकतो. हा कंपनीच्या नॉर्ड लाइनअपमधील सर्वात स्वस्त हँडसेट पैकी एक असू शकतो. याची लीक झालेली किंमत देखील बजेट फ्रेंडली डिवाइसकडे इशारा करते. एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार आगामी वनप्लस नॉर्ड सीई 4 लाइटची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते.

हा फोन चीनमध्ये आलेल्या Oppo A3 चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो, अशी देखील माहिती लीक झाली आहे. त्यामुळे यात Snapdragon 6 Gen 1 चिपसेट दिला जाऊ शकतो. कंपनी यात अँड्रॉइड 14 आधारित ऑक्सिजन ओएस देऊ शकते. यातील 6.67 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तर फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळेल.

Source link

jiomart digitalOnePlusoneplus jiomart digital partnershipवनप्लसवनप्लस फोनवनप्लस फोन्स बंदी
Comments (0)
Add Comment