भाजीवाल्यानं जीव दिला, कारण ठरले २ पोलीस; ‘तो’ VIDEO समोर येताच पोलीस दलात खळबळ

लखनऊ: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक आणि हवालदाराच्या त्रासाला कंटाळून एका भाजी विक्रेत्यानं आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक आणि हवालदार भाजी विक्रेत्याकडून पैसे हिसकावून घ्यायचे, त्याला शिवीगाळ करायचे असे आरोप आहेत. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून भाजी विक्रेत्यानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी भाजी विक्रेत्यानं त्याची व्यथा मांडली. पोलीस निरीक्षक पैसे हिसकावत असल्याचा, शिवीगाळ करत असल्याचा आरोप त्यानं केला. भाजी विक्रेत्यानं मांडलेल्या कैफियतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमवारी मध्यरात्री त्यानं जीवनप्रवास संपवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली. मृताच्या कुटुंबियांच्या मनात पोलिसांबद्दल प्रचंड रोष आहे.
भयंकर! धावती बुलेट पेटली, आग विझवताना स्फोट; मदतीला धावलेले अक्षरश: उडाले, एकाचा मृत्यू
भाजी मंडईत सुशील कुमार यांचं दुकान होतं. तिथे ते भाजी विकायचे. त्यांनी सोमवारी मध्यरात्री गळफास लावून घेतला. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ चित्रित केला. आपल्याला होत असलेला त्रास त्यात सुशील यांनी मांडला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खाली येण्याऐवजी लिफ्ट वेगात वर; २५ व्या मजल्याचं छत तोडलं, घटनेनं परिसरात खळबळ
मंडी पोलीस चौकीचे प्रभारी सत्येंद्र यादव अनेकदा शिवीगाळ करतात, त्रास देतात. वारंवार पैसे हिसकावून घेतात. जबरदस्तीनं भाजी घेऊन जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी माझ्याकडून ५ हजार रुपये हिसकावले होते. ते चारचौघांत माझा अपमान करतात. त्यांच्यासोबत हवालदार अजय यादवही असतात. या दोघांच्या त्रासाला कंटाळून मी जीव देत असल्याचं सुशील यांनी व्हिडीओमध्ये म्हटलंय.

Source link

policeuttar pradeshVegetable Seller Suicideआत्महत्यापोलीसभाजी विक्रेत्याची आत्महत्या
Comments (0)
Add Comment