दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते कुटुंबिय
ग्वालियरच्या पोलीस महानिरिक्षक कार्यालयात एएसआय अर्थात सहाय्यक उपनिरीक्षक म्हणून तैनात असलेल्या निशा जैन कॉन्स्टेबल अखंड प्रताप सिंह यांच्यात अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही वेगवेगळ्या समाजाचे होते. त्यामुळे दोघांच्या लग्नासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून विरोध होता.
दोघांचे मोबाईल स्विच ऑफ
७ मे रोजी दोघांनी निवडणुकीच्या काळात आपापली ड्यूटी केली. त्यानंतर ८ ने रोजी दोघं आपापल्या घरातून ड्यूटीवर येण्यासाठी निघाले, पण ते कार्यालयात आले नाहीत. संध्याकाळी महिला एसएसआय घरी पोहोचली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. तिचा मोबाईल स्विच ऑफ होता. त्यानंतर कार्यालयात चौकशी केली असता, ती तिथेही ड्यूटीवर पोहोचली नसल्याचं समजलं. तिच्या कुटुंबियांनी आपल्या मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.
मंदिरात लग्न केल्याची माहिती
दोघांनी आर्य समाजातील मंदिरात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचं लोकेशन दिल्ली असल्याचं समजतं आहे. कोणतीही माहिती न देता कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने पोलीस महानिरिक्षक अरविंद सक्सेना यांनी महिला एएसआय आणि कॉन्स्टेबल या दोघांनाही निलंबित केलं आहे.