धक्कादायक: कॅन्सरवरील बनावट औषधांची विक्री; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

हायलाइट्स:

  • कॅन्सरवरील बनावट औषधांची विक्री.
  • मुंबई पोलिसांचा कल्याणमध्ये छापा.
  • ६७ लाखांची औषधे व इंजेक्शन हस्तगत.

मुंबई: नामांकित कंपन्यांच्या नावाचा वापर करून कॅन्सरच्या आजारावरील बनावट औषधे आणि इंजेक्शन यांची विक्री करणाऱ्या कंपनीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कंपनीच्या कल्याण येथील गोदामात छापा टाकून पोलिसांनी एका ३१ वर्षीय महिलेला अटक केली. या गोदामातून औषधे आणि इंजेक्शनचा सुमारे ६७ लाखांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. कॅन्सर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या या रॅकेटमध्ये मोठी साखळी सक्रिय असल्याचा संशय आहे. ( Duplicate Cancer Medicines Mumbai News )

वाचा: मुंबईतील धार्मिक स्थळांसाठी ‘ही’ महत्त्वाची अट; पालिकेचा आदेश जारी

जपानच्या टकेदा फार्मासुटिकल्स या कंपनीच्या मार्फत अ‍ॅडसेट्रिस इंजेक्शन आणि इक्लुसिग या कॅन्सरवरील गोळ्यांचे उत्पादन केले जाते. ही इंजेक्शन आणि गोळ्यांना प्रचंड मागणी असल्याने भारतामध्ये विशेष करून मुंबई येथे काही कंपन्या त्याची बेकायदा निर्मिती करीत असल्याची तक्रार कंपनीच्या वतीने मुंबई पोलीस यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे नियंत्रण पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने या तक्रारीबाबत तपास सुरू केला. त्यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. आधीच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने रुग्ण त्रस्त असताना त्यात बनावट औषधे विकून प्राइम हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रुग्णांच्या जीविताशी खेळत असल्याचे स्पष्ट झाले.

वाचा: राज्यात नवरात्रोत्सवामध्ये गरबा घुमणार, पण…; टोपे यांची मोठी घोषणा

प्राइम हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अ‍ॅडसेट्रिस इंजेक्शन आणि इक्लुसिग औषधांचा बेकायदा साठा करून त्याची विक्री करीत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यानुसार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे नियंत्रण पथकाने या कंपनीच्या कल्याण नेतिवली नाका येथील गोदामामध्ये छापा टाकला. या ठिकाणी अ‍ॅडसेट्रिस इंजेक्शनच्या जवळपास ४० लाखांच्या इंजेक्शनच्या बाटल्या आणि सुमारे २७ लाखांच्या इक्लुसिग या गोळ्यांचा साठा सापडला. पोलिसांनी हा साठा हस्तगत केला असून परवानगी नसतानाही ही औषधे आणि गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वाचा:नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र; कारण…

Source link

duplicate cancer medicines mumbai newsduplicate cancer medicines newsduplicate cancer medicines racketmumbai police kalyan raid newsmumbai police on duplicate cancer medicinesअॅडसेट्रिस इंजेक्शनकल्याणकॅन्सरप्राइम हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमुंबई पोलीस
Comments (0)
Add Comment