ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी…, नरेंद्र मोदींचे सूचक वक्तव्य

वाराणसी : ‘ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनासाठी अयोग्य होईल,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वक्तव्य केले आहे. माझ्या देशातील लोक मला मतदान करतील, असा विश्वास देखील मोदी यांनी दर्शवला आहे.

न्युज 18 इंडिया या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदी यांनी ही टिप्पणी केली आहे. मंगळवारी वाराणसी येथे त्यांनी सलग तिसऱ्यांदा खासदारकीसाठी नामांकन अर्ज भरला आहे. त्यानंतर वृत्तवाहिनीला दिलेल्या या मुलाखतीच्या काही क्लिप्स त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केल्या आहेत.
PM Modi Net Worth: मोदींची संपत्ती ५ वर्षात ‘इतक्या’ लाखांनी वाढली, ना घर ना आलिशान कार, तरीही कोटींची मालमत्ता
विशेष म्हणजे मोदींनीच राजस्थानच्या बंसवारा येथील सभेत मुस्लिम समाजाला संपत्ती वाटण्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर वार केला होता. ते म्हणाले होते, ‘यापूर्वी ते सत्तेत असताना राष्ट्राच्या संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे त्यांनी म्हटले होते. म्हणजे ही संपत्ती ते कोणाला वाटणार? ज्यांना जास्त मुले आहेत त्या घुसखोरांना देतील. तुमच्या कष्टाचे पैसे घुसखोरांना द्यावेत का? याच्याशी तुम्ही सहमत आहात का?

बंसवारा येथे केलेल्या या वक्तव्याबद्दल भाजपाविरोधात निवडणूक आयोगात तक्रार काँग्रेसकडून निवडणूक आयोगात तक्रार देखील करण्यात आली होती. ज्याची दखल घेत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस देखील बजावण्यात आली. त्यानंतर मंगळवारी मोदी यांची अशी टिप्पणी समोर आली की, ‘मी हिंदू किंवा मुस्लिम असे म्हटलेले नाही. मी म्हटले आहे की, तुम्ही जितकी मुलं सांभाळू शकता तितकी मुले असावीत. सरकारला पाठिंबा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण करू नका.

मुस्लिम त्यांना मतदान करतील का आणि त्यांना समाजाच्या मतांची गरज आहे का? असे विचारले असता मोदी म्हणाले, मला विश्वास आहे की माझ्या देशातील लोक मला मतदान करतील. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, तेव्हा सार्वजनिक जीवनासाठी मी अयोग्य होईल. आणि मी हिंदू-मुस्लिम करणार नाही. हा माझा संकल्प आहे.
Uttar Pradesh: इराणींची पहिली लढाई पक्षांतर्गत नाराजीशी; अमेठीत भाजप कार्यकर्त्यांचा रोष शांत करण्याचे आव्हान
“मी घरे दिली तर मी त्याच्या पूर्णत्वाबद्दल बोलतो. १०० टक्के वितरण. याचा अर्थ असा की एखाद्या गावात २०० घरे असतील, कोणत्या समाजाची, कोणत्या जातीची, कोणत्या धर्माची – नाही. त्या २०० घरांमध्ये ६० लाभार्थी (लाभार्थी) असतील तर सर्वांना ६० जणांना लाभ मिळालाच पाहिजे. आणि १०० टक्के पूर्णत्व म्हणजे सामाजिक न्याय आणि खरी धर्मनिरपेक्षता. आणि त्यात भ्रष्टाचाराला कुठेही वाव नाही. तुम्हाला माहिती आहे की, जर या सोमवारी दुसऱ्या व्यक्तीला ते मिळाले तर मला ते पुढच्या सोमवारी मिळेल,” असे देखील मोदी म्हणाले आहेत.

Source link

Congresshindu-muslim controversyNarendra Modipm interviewpm modi. bjpVaranasi Loksabhaकाँग्रेसभाजपामोदींची मुलाखतवाराणसीहिंदू- मुस्लीम वाद
Comments (0)
Add Comment