हायलाइट्स:
- पंजाब काँग्रेसमधील अंतर्गंत वाद समोर
- काँग्रेस अध्यक्षपदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
- संजय राऊत यांनी दिला हा सल्ला
मुंबईः ‘राहुल गांधींनी (Rahul Gandhi)अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याचं चित्र दिसतंय. याचा फायदा भाजपसारखे पक्ष घेत आहेत. काँग्रेस (Congress) देशातला प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि तो राहिल. भविष्यात राजकारण करताना काँग्रेसशिवाय राजकारण करता येणार नाही. अशा वेळी काँग्रेस नेतृत्वानं अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, तर नक्कीच देशाला विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल,’ असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गंत कलहाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटायला सुरुवात झाले आहेत. अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. त्यावर आज संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच, काँग्रेस अध्यक्षपदाबाबतही राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वाचाः पुन्हा आभाळ फाटलं! औरंगाबाद शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस; नदीला पूर
‘काँग्रेस पक्ष देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्रलढ्यात मोलाचं योगदान दिलं आहे. अनेक मोठे नेते काँग्रेसने दिले आहेत. अशा वेळी काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणं याविषयी लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो. आज राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी आहेत. तरीही काँग्रेसला अध्यक्ष नाही. जर कोणी तशी मागणी केली तर ती मागणी योग्य असेल,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचाः देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा, तर पंकजा मुंडे आजारी; चर्चेला उधाण
अग्रलेखात काय म्हटलं आहे?
काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार महामंडळाने ‘जी-२३’ नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाट्यावर आणत आहेत. राहुल गांधींनी देशातील ‘जनतेचा आवाज’ बनू नये, असाही या म्हातार महामंडळाचा आग्रह असतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. मीडियावरूनही मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बहुधा हेच काँग्रेसमधील या ‘म्हाताऱ्या अर्कां’ ना खटकत आहे, असं शिवसेनेने आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
वाचाः ‘राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?’