सोशल मीडियाचा दबाव, अखेर मोदींविरोधात श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज दाखल

वाराणसी : स्‍टैंडअप कॉमेडियन श्याम रंगीलाने अखेर वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. श्याम रंगीलाने आपल्या सोशल मीडियावरुन हँडलवरुन ही माहिती दिली आहे. वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आपला नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर त्याचदिवशी श्याम रंगीलाने देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

‘एक्स’ अकाउंटवर माहिती देत श्याम रंगीला म्हणाला की, ‘तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्यामुळे मला बळ मिळाले आणि आज उशिरा का होईना नामांकन दाखल झाला. सर्व कागदपत्रे, प्रक्रिया आणि इतर अडथळ्यांवर मात केल्यानंतर आम्ही आता वाराणसीच्या लोकांसाठी पर्याय बनण्याच्या उंबरठ्यावर आहोत. आता आणखी दोन-तीन दिवस वाट पाहा. चिन्ह आल्यास आम्ही सर्व ताकदीने, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने लढू. आपल्या लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात माझे निवडणूकीचे भवितव्य आहे. ते सर्व आपला विश्वास दृढ करतील.’
ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लिम करेन, त्या दिवशी…, नरेंद्र मोदींचे सूचक वक्तव्य
विशेषकरुन श्याम रंगीला गेल्या तीन दिवसांपासून दावा करत होता की, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नामांकन अर्ज दाखल करण्यापासून रोखले जात आहे. त्यातच १४ मे ला अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. भाजपाचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार प्रस्तावकांसह अर्ज दाखल केला. यावेळी अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते. यानंतर याचदिवशी श्याम रंगीला यांच्यासह अनेक उमेदवारांचा अर्ज दाखल केला गेला. दुपारी ३ नंतर श्याम रंगीलासह अन्य इच्छुक उमेदवारांचे देखील अर्ज दाखल करण्यात आले.
Uttar Pradesh: इराणींची पहिली लढाई पक्षांतर्गत नाराजीशी; अमेठीत भाजप कार्यकर्त्यांचा रोष शांत करण्याचे आव्हान
नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना श्याम रंगीला म्हणाला, माझा नामांकन अर्ज स्वीकारण्यात आला आहे. मोदीजी बोलतात गंगा मय्याने मला आपल्या ओंजळीत घेतलं आहे, पण मोदीजी आम्हालाही याच गंगा मय्याने ओंजळीत घेतलंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक मला ताकद देतीलच, आम्ही आतापर्यंत जेवढं लढलो आहोत, त्यावरुन आमचा विजय पक्का आहे.

Source link

bjpelection nominationloksabha electionPM Modishyam rangilaVaranasi Loksabhaपंतप्रधान नरेंद्र मोदीभाजपालोकसभा निवडणूकवाराणसी लोकसभाश्याम रंगीला
Comments (0)
Add Comment