Shukra Gochar In vrishabha rashi :
मोहिनी एकादशीच्या दिवशी शुक्र ग्रहाचे वृषभ राशीत संक्रमण होणार आहे. वृषभ राशी ही शुक्र ग्रहाची स्व राशी आहे. रविवारी १९ मे ला शुक्र सकाळी ०८.५१ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे त्यांच्या विशिष्ट कालावधीनुसार संक्रमण होत असते. शुक्र हा स्त्री ग्रह कारक असून वृषभ त्याची रास आहे. शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, सुख विलास आणि प्रेमाचा कारक म्हणून ओळखले जाते. ज्या ज्या वेळी शुक्र आपली राशी बदलतो त्यावेळी त्याचा चांगला आणि वाईट परिणाम हा आर्थिक स्थिती आणि राहाणीमानावर पडतो.
शुक्र हा प्रेम, सौंदर्य, आनंद आणि सद्भावनेशील संबंधित ग्रह आहे. तर वृषभ राशीला स्थिरता, कामुकता आणि शारीरिक आरामाशी संबंधित राशी मानले जाते. ज्यावेळी शुक्र वृषभ राशीत असतो तेव्हा तो उच्च मानला जातो. शुक्राचे हे स्थान प्रेम आणि नाते संबंधात अधिक अनुकूल मानले जाते.
शुक्राचे वृषभ राशीत संक्रमण झाल्यामुळे कर्क राशीसह ६ राशींचे लोक मालामाल होणार आहेत. लवकरच प्रेमविवाह होऊ शकतो. या लोकांना आर्थिक लाभ होतील. नोकरी करणाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. जाणून घेऊया कोणत्या राशीला कसा फायदा होईल त्याबद्दल
1. मेष
शुक्राच्या संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होईल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना नफा होणार आहे. कामाचा विस्तार कराल. अडकलेले पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैवाहिक जीवनात रोमांस वाढेल. इच्छुकांचे लवकरच लग्न होणार आहे.
2. वृषभ
स्व राशीत शुक्राचे संक्रमण अधिक लाभदायक ठरेल. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. आर्थिक संकट दूर झाल्याने तुमचे मन आनंदी राहिल. तुम्ही गरजेच्या ठिकाणी पैसे खर्च कराल. तसेच अनेक स्त्रोतांकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
3. कर्क
शुक्राच्या राशीतील बदल कर्क राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. नोकरीत मोठा फायदा होईल. ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. पदोन्नतीसोबत पगारवाढही लवकरच होणार आहे. या संक्रमणानंतर तुमची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल. जीवनात सुखसुविधा वाढतील. या काळात बचत कराल.
4. सिंह
नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. आवडीच्या ठिकाणी काम मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पदोन्नती मिळण्याची वेळ आहे. कोणतेही काम कराल त्यात यश मिळेल. पैसे जपून खर्च कराल.
5. वृश्चिक
शुक्र राशीच्या संक्रमणामुळे या राशीचे लोक धनवान होतील. यामध्ये तुमची संपत्ती, समृद्धी, सुख आणि सुविधांमध्ये लवकरच वाढ होणार आहे. या काळात अनेक स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. ज्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गातील लोकांना फायदा होईल.
6. कुंभ
शुक्र राशीतील बदलामुळे तुमचे नशीब उजळेल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील. या काळात तुमची प्रगती झपाट्याने होईल. गुंतवणूक केल्यास आर्थिक लाभ मिळतील. गुंतवणूक करताना विचारपूर्वक कराल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमची स्तुती होईल.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.