२० वर्षांच्या भारतीय तरुणाची धक्कादायक कबुली, सांगितलं व्हाइट हाऊसवर हल्ला करण्याचं कारण

वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

भाड्याने ट्रक घेऊन तो व्हाइट हाऊसवर धडकवल्याची कबुली अमेरिकेत राहणाऱ्या २० वर्षांच्या भारतीय तरुणाने दिली आहे. लोकशाही सरकार उलथून टाकून, नाझी जर्मनीच्या विचारसरणीचे सरकार आणण्याच्या विचाराने त्याने हा हल्ला घडवून आणला होता, असे अमेरिकेच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

गेल्या वर्षी २२ मे रोजी मिसूरीमधील सेंट लुईस येथील साई वर्शीथ कंदुला याने सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने भाड्याने ट्रक घेऊन व्हाइट हाऊसच्या परिसरात धडक दिली, असे याचिकेत म्हटले होते. स्थानिक न्यायालयाचे न्यायाधीश डॅबनी एल. फ्रेडरिक यांनी २३ ऑगस्ट रोजी त्याला शिक्षा सुनावली. लोकशाही सरकार उलथवून टाकण्याचा आणि नाझी विचारसरणीवर आधारित सरकार चालवण्यासाठी अमेरिकेचा कारभार हाती घेण्याचा कंदुला याचा हेतू होता. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यकता भासली असती, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतरांची हत्या घडवून आणली असती, अशी कबुली कंदुला याने तपास यंत्रणांसमोर दिली, असे वकिलांनी सांगितले.

कंदुला मागील वर्षी २२ मे रोजी दुपारी विमानाने सेंट लुईस ते वॉशिंग्टन डीसी येथे आला. डलास आंतरराष्ट्रीय विमानळावर ५.२० वाजता आलेल्या कंदुलाने ६.३० वाजता ट्रक भाड्याने घेतला होता.

Source link

attack on white houseindian youth shocking confessionwhite housewhite house attack by indian boy
Comments (0)
Add Comment