‘डावे’ लढले पण ‘उजवे’ ठरण्याची शक्यता नाहीच… आयेगा तो राहुल गांधी ही!

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : केरळमध्ये लोकसभेच्या सर्व २० जागांवर मतदान झाल्यावर आढावा घेऊन काढलेल्या भाकपच्याच पक्षांतर्गत निरीक्षण अहवालात वायनाडच्या बहुचर्चित जागेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर पक्षाच्या उमेदवार ॲनी राजा यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तविल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. मात्र असा अहवाल पूर्ण डाव्या आघाडीच्या कामगिरीबद्दल असल्याचा दावा भाकप नेते करतात. याच अहवालात डावी आघाडी (एलडीएफ) केरळमध्ये २० पैकी १२ जागा जिंकण्याचा दावा करण्यात आला आहे.इंडिया आघाडीतील माकप-भाकप व डाव्या आघाडीने केरळात काँग्रेसपासून फारकत घेऊन स्वतंत्र निवडणूक लढवली असून काँग्रेसला कडवे आव्हान दिले आहे. डाव्या लोकशाही आघाडीतील (एलडीएफ) सत्ताधारी माकपचा सहकारी असलेल्या भाकपने यंदाही चार जागांवर उमेदवार उभे केले होते. भाकपचे सर्वोच्च नेते, सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी ॲनी यांना वायनाडमधून उमेदवारी दिल्यावर काँग्रेस हायकमांड व राजा यांच्यातील दरी वाढल्याचे चित्र रामलीला मैदानावर इंडियाच्या सभेत जाहीरपणे दिसले होते.
Pune Lok Sabha: मनसेची रसद, वंचित, MIM चं आव्हान, काँग्रेसविरोधात गड राखण्यात भाजपला यश येणार?

माकप नेतृत्वाने पडद्याआडून काही प्रयत्न केले तरी ॲनी राजा यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यांच्याशिवाय भाकपचे पन्नियान रवींद्रन यांनी तिरुअनंतपुरम मधून, व्ही एस सुनील कुमार यांनी त्रिशूरमधून तर अरुण कुमार यांनी मावेलिकारामधून निवडणूक लढवली. तिरुअनंतपुरममधून काँग्रेसचे शशी थरूर पुन्हा निवडणूक रिंगणात असले तरी या जागेवर थरूर व भाजपचे मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर भाकपचे रवींद्रन हेच निसटत्या फरकाने का होईना पण भारी पडणार, असाही दावा या अहवालात केलेला आहे.
Amit Shah : भाजपात निवृत्ती वय ७५? सप्टेंबर २०२५ मध्ये तुम्ही पंतप्रधान? अमित शाह म्हणाले, वेगळ्या परिस्थितीत…

वायनाडमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी साडेचार लाखांपेक्षा जास्त मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला तेव्हा त्यांच्यासमोर भाकपचेच पी पी सुनीर होते. यावेळी राहुल यांना वायनाडमधून निवडणूक लढवण्यास भाकपने पुन्हा विरोध केला. राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडावी आणि उत्तर भारतातील त्यातही अमेठी-रायबरेलीतील एखाद्या जागेवरून निवडणूक लढवावी, अशी भाकपची इच्छा होती. मात्र या जागेवर इंडियातील काँग्रेससह मुस्लिम लीग, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (जेकब), क्रांतीकारी समाजवादी पक्ष व इतर अनेक लहान पक्षांची युती भाकपवर भारी पडू शकते असे डाव्यांचाच हा अहवाल सांगतो.

सूत्रांच्या माहितीनुसार ॲनी राजा वायनाडमध्ये चांगली कामगिरी करतील आणि पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढेल. परंतु राहुल गांधींच्या विरोधात त्या जिंकू शकणार नाहीत. केरळमध्ये डावी लोकशाही आघाडी २० पैकी १२ जागा जिंकेल, असा दावाही डाव्या आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. २०१९ मध्ये या चारही जागांवर भाकपचा पराभव झाला होता. तेव्हा राज्यात काँग्रेसला १५ तर मुस्लिम लीगला २ जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगाल व त्रिपुरा हे गड पूर्ण गमावणाऱ्या डाव्या आघाडीच्या पदरात केरळमध्येही केवळ ३ जागा पडल्या होत्या. यंदा ते चित्र सुधारेल असा विश्वास या अहवालात करण्यात आला.

Source link

Keral Wayanad Lok Sabhalok sabha electionlok sabha election 2024Rahul Gandhi vs Annie RajaWayanad Lok Sabhaराहुल गांधी vs अॅनी राजालोकसभा निवडणूक २०२४वायनाड लोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment