Greenline Issue: वनप्लस, सॅमसंग नंतर आता ‘या’ कंपनीच्या फोन्सवर येत आहे ग्रीन लाइन

वनप्लस आणि सॅमसंगनंतर आता नथिंग कंपनीच्या प्रीमियम फीचर्सच्या स्मार्टफोन्सच्या ग्राहकांना ग्रीन लाइनची समस्या भेडसावू लागली आहे. जेव्हापासून ग्रीन लाईनचा मुद्दा समोर आला आहे, तेव्हापासून प्रत्येक स्मार्टफोन यूजरला काळजी वाटते की पुढचा नंबर आपल्या फोनचा असेल की नाही…? फोनच्या डिस्प्लेवर ग्रीन लाईन कधी दिसेल याविषयी काहीही सांगता येत नाही. नथिंग फोन 2ss चालवणाऱ्या युजरच्या फोनमध्ये अलीकडेच हा प्रकार समोर आला आहे.

Nothing Phone 2a स्मार्टफोन वापरणाऱ्या या यूजरने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर फोनची काही छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात स्क्रीनवर ग्रीन लाइन स्पष्टपणे दिसू शकते. Nothing Phone 2a मधील ग्रीन लाईनचे हे पहिले प्रकरण आहे, कारण याआधी या डिवाईस अशा समस्येबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ट्विटर यूजरने शेअर केला व्हिडीओ

हृषभ पायल नावाच्या X खात्यावरून माहिती शेअर केली गेली आहे की नथिंग फोन 2a मध्ये ग्रीन लाइन समस्या येत आहे. माहिती देण्यासोबतच फोनचे दोन फोटोही शेअर केले आहेत, ज्यावरून असे दिसून येते की यूजर्सना फोनच्या राइड साइडवर ग्रीन लाईनची समस्या भेडसावू लागली आहे. त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. त्यामध्ये या समस्येबद्दल त्यांनी सांगितले आहे.

ग्रीन लाईन दिसण्यामागे सॉफ्टवेअर अपडेट हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. आम्ही तुम्हाला आठवण करून देतो की, याआधी, नथिंग फोन 1 मध्ये ग्रिन रंगाची समस्या देखील होती, जी नंतर कंपनीने सॉफ्टवेअर अपडेटद्वारे दुरुस्त करण्यात आली होती होती.

OnePlus स्मार्टफोनमध्येही दिसली ही समस्या

वनप्लस ब्रँडच्या काही मॉडेल्समध्ये ग्रीन लाइन इश्यू देखील दिसला. OxygenOS 13 वर काम करणाऱ्या OnePlus 8 Pro, OnePlus 8, OnePlus 9, OnePlus 8T आणि OnePlus 9R सारख्या स्मार्टफोनमध्येही ग्रीन लाइनची समस्या आली. कंपनी आता अशा युजर्सना आजीवन स्क्रीन वॉरंटी देत आहे ज्यांना त्यांच्या OnePlus स्मार्टफोनमध्ये ग्रीन लाइन समस्येचा सामना करावा लागत आहे.

Samsung स्मार्टफोनमध्येही हीच समस्या

Samsung Galaxy S20 मालिका, Note 20 मालिका, S21 मालिका आणि S22 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये ग्रीन लाइनची समस्या आली. या समस्येनंतर सॅमसंगने असेही जाहीर केले होते की, ग्रीन लाइनच्या समस्येचा सामना करणाऱ्या सर्व ग्राहकांना कंपनीकडून एक वेळ मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटचा लाभ मिळेल.

Source link

Greenline IssueNothing Phonenothing phone (1) price in indianothing phone problemsamsung
Comments (0)
Add Comment