Fact Check: काँग्रेस नेते राहुल गांधींनी संविधान संपवण्याचं म्हटलं? जाणून घ्या व्हायरल दाव्याचं सत्य

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राज्यघटनेवरून केंद्र आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ शेअर करताना, असा दावा केला जात आहे, की एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने सरकार बनवल्यानंतर राज्यघटना रद्द केली जाईल. मात्र, सोशल मीडियावर करण्यात येत असलेला हा दावा खोटा आहे. राहुल गांधी यांनी असं कोणतंही विधान केलेलं नाही.राहुल गांधींचा हा व्हिडिओ एका यूजरने विश्वास न्यूजला पाठवला. या व्हिडिओची पडताळणी केली असता, सोशल मीडिया आणि इतरही अनेक युजर्स हा व्हिडिओ शेअर करत आहेत. राहुल गांधी यांनी संविधान रद्द करण्याची भाषा केली असल्याचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. इतर अनेक युजर्सनी (आर्काइव लिंक) याच दाव्यासह व्हिडिओ शेअर केला आहे.

अशात विश्वास न्यूजने या व्हिडिओचा तपास करण्यासाठी व्हायरल क्लिपमधील की-फेम्स रिव्हर्स इमेज सर्च केलं. त्यानंतर खरा मूळ व्हिडिओ सापडला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आढळून आला आहे. २९ एप्रिल २०२४ रोजी तो अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्तीसगडमधील बिलासपूर येथील काँग्रेसच्या निवडणूक सभेचा आहे, ज्यात राहुल बोलतात, भाजप नेते म्हणतात, फक्त एकच नाही तर अनेकांनी म्हटलं आहे, की आमचे सरकार स्थापन झालं, तर यावेळी संविधान नष्ट करू.

यातून स्पष्ट होतं, की व्हायरल झालेला व्हिडिओ एडिटेड आणि अपूर्ण आहे. विश्वास न्यूजने आपला तपास पुढे नेला आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अभिमन्यू त्यागी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, हा व्हिडिओ खोटा आहे, राहुल गांधी प्रत्येक जाहीर सभेत संविधान वाचवण्याची भाषा करतात.

निष्कर्ष

विश्वास न्यूजच्या तपासात, संविधान रद्द होणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा पूर्णपणे खोटा आहे. निवडणुकीत राहुल गांधींचा दुष्प्रचार करण्याच्या उद्देशाने हा बदललेला व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(This story was originally published by Vishvas News, and republished by MT as part of the Shakti Collective.)



Source link

fact check newsRahul Gandhirahul gandhi Fact Checkrahul gandhi on constitution fake videoराहुल गांधीराहुल गांधी फॅक्ट चेकराहुल गांधी संविधान व्हायरल व्हिडिओ
Comments (0)
Add Comment