कोलकाता शहराची ट्विन सिटी ‘हावडा’ला विकासाची आस! सलग चौथ्या विजयी गोलसाठी तृणमूल उत्सुक

विजय महाले, कोलकाता : राजधानी कोलकाता शहराची ट्विन सिटी म्हणून हावडा शहर मानले जाऊ शकते. मात्र, त्याचे कोलकातापेक्षा खूप भिन्न रूप आहे. श्रमिकांची त्यातही परप्रांतीयांची संख्या अधिक असलेल्या या गजबजलेल्या मतदारसंघात डाव्या आघाडीला ‘कमबॅक’ करण्याची आस आहे. बूथ बळकट असल्याने तृणमूल काँग्रेसला जिंकण्याचा विश्वास आहे. तर, काँग्रेस-डाव्यांमुळे मतविभाजनाची भीती भाजपला सतावत आहे.अतिशय दाटीवाटीत उभे राहिलेल्या, चिंचोळ्या गल्ल्यांमधून पक्क्या सिमेंटच्या रस्त्यांवर ई-रिक्षा धावते, तेव्हा हावडा शहर पश्चिम बंगालमध्ये आलेल्या श्रमिकांची कर्मभूमी असल्याचे जाणवते. स्थानिकांसोबत राजस्थान, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश या शेजारील राज्यांमधील परप्रातीयांची संख्या येथे भरमसाठ आहे. याच सुमारे २५ ते ३० टक्के श्रमिक शक्तीभोवतीच हावडाचे राजकारण फिरते.

Pune News : लांब पल्ल्यांच्या एसटी वेळापत्रकात बिघाड; स्थानकांवर प्रवाशांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष
हावडा शहर आणि मतदारसंघातून फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे कोणतेही नियोजन नसलेला हा सर्व परिसर आहे. कामधंद्याच्या बाबतीत मुंबईची आठवण व्हावी, अशी स्थिती आहे. अगदी चार बाय चारच्या छोट्याशा खोपट्यात बसता येईल अशा जागेत टुकटूक करणाऱ्या मशिनवर किमान दोन कामगार तरी काम करताना दिसतात. दुकानात स्टूलवर उभे राहून किंवा बसल्या जागी चोहोबाजूला हात फिरवित ग्राहकाला लागणारे साहित्य न बघता काढून देणारे सरसावलेले विक्रेतेही दिसतात.

राजकारणाच्या विषयावर ते अजिबात बोलत नाहीत. हुगळी नदीपल्याड असलेले हावडा स्टेशन-शहर आणि अन्य काही उपनगरांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ विकासापासून दूर असण्याबद्दल स्थानिकांना खंत वाटत नाही. नाही म्हणायला, या शहरात मेट्रो पोहोचली आहे. मात्र, ‘रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हायला हव्यात’, असे बारावी झालेला ज्यूस सेंटरमध्ये काम करणारा सलीम सांगतो. ‘आहे ते कामधंदे बंद होत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर आमचे व्यवसाय कसे काय चालणार?’, असा प्रश्न पडलेल्या आणि साठीकडे झुकलेल्या रजनीलाल यांच्या चकाकणाऱ्या डोळ्यांमधून भविष्याविषयीची चिंता उमटते.

प्रसून बॅनर्जी हे ‘तृणमूल’चे विद्यमान खासदार आहेत. भारतीय फूटबॉल संघाचे ते माजी खेळाडू. क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना अर्जुन पुरस्कारदेखील मिळाला आहे. ‘सेलिब्रेटी फेस’ असलेले प्रसून आता चौथ्यांदा लोकसभा रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने हावडा महापालिकेचे महापौर राहिलेल्या डॉ. रथिन चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आहे. होमिओपॅथी डॉक्टर म्हणूनही ते स्थानिकांना परिचित आहेत. या दोन्ही उमेदवारांपुढे ‘माकप’ने तुलनेने ‘फ्रेश’ चेहरा असलेले अॅड. सब्यसाची चॅटर्जी यांना संधी दिली आहे. अॅड. सब्यसाची हे कोलकाता उच्च न्यायालयात वकिली करतात. हावडा शहराचे अनेक मुद्दे त्यांनी न्यायालयात जोरकसपणे मांडलेले आहेत.

फेरबदल करणारी मानसिकता

हावडामध्ये विधानसभेचे सात मतदारसंघ येतात. यात हावडा महानगरातील तीन तसेच शेजारील बाली, शिवपूर, पंचला आणि अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या संक्रेल यांचा समावेश होतो. ते सर्व मतदारसंघ ‘तृणमूल’च्या ताब्यात आहेत. राज्यात डाव्या आघाडीची सलग ३४ वर्षे सत्ता असतानाही हावडामध्ये टप्प्याटप्प्याने फेरबदल होत राहिले. १९७१ ते १९८४ असे तीन टर्म ‘माकप’चे समर मुखर्जी खासदार होते. त्यानंतर ती संधी ‘तृणमूल’चे विद्यमान खासदार प्रसून बॅनर्जी यांना मिळाली. मधल्या काळात काँग्रेसचे खासदार येथून निवडून आलेले आहेत.

मतदारांवर दबाव

नोकरी, मजुरी, व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या परप्रांतीयांवर प्रचंड दबाव असल्याचा दावा हावडा मध्य येथील भाजप कार्यकर्ता अभिषेक सिंह हा करतो. ‘मत दिले नाही तर वीज, पाणी मिळणार नाही’, अशा थेट धमक्या स्थानिक आमदार देत असल्याचा त्याचा आरोप आहे. मतदार ‘तृणमूल’च्या दबावाखाली असल्याचे अंजन विश्वास हा ‘माकप’ कार्यकर्ताही सांगतो. या परिस्थितीत आम्ही बदल घडविणारच, असा तो दावा करतो.

Source link

bjp in kolkatahowrah cityhowrah newskolkata twin cityloksabha election 2024Trinamool Congressतृणमूल काँग्रेसमाकपहावडा बातमीहावडा महापालिका
Comments (0)
Add Comment