ममता बॅनर्जींचं इंडिया आघाडीला ‘बाहेरुन समर्थन’; राजकीय वर्तुळात खळबळ

कोलकाता : लोकसभा निवडणूक जसजशी पुढे जात आहे. तसतशा रंजक घडामोडी समोर येत आहेत. अशीच घडामोड पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. इंडिया आघाडीत जागावाटप फसल्याने काढता पाय घेतलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आता इंडिया आघाडीला ‘बाहेरुन पाठिंबा’ जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर ही भूमिका घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

चिनसुरा येथे तृणमूल काँग्रेसच्या हुगळीच्या उमेदवार रचना बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘आम्ही इंडिया आघाडीला नेतृत्व देऊ आणि त्यांना बाहेरून सर्व प्रकारे मदत करू. बंगालमधील आमच्या माता-भगिनींना कधीही कोणतीही अडचण येणार नाही आणि १०० दिवसांच्या नोकरीच्या योजनेत सहभागी होणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही हे सुनिश्चित करणारे सरकार आम्ही स्थापन करू.’ तसेच त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखालील सीपीएम किंवा बंगाल काँग्रेसचा यामध्ये समावेश नाही, असे देखील ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
कोलकाता शहराची ट्विन सिटी ‘हावडा’ला विकासाची आस! सलग चौथ्या विजयी गोलसाठी तृणमूल उत्सुक
लोकसभा निवडणूकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर पाचव्या टप्प्यात २० तारखेला ६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ४९ लोकसभेच्या जागांवर मतदान पार पडणार आहे. यात बंगालमधील ७ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. याआधीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला बाहेरुन समर्थन देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ममता बॅनर्जी यांनी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान इंडिया आघाडीशी फारकत घेतली होती. ममता बॅनर्जी या वारंवार घेत असलेली ‘एकला चलो’ची भूमिका त्यांचं राजकीय अस्थैर्य दर्शवत असल्याची टिप्पणी देखील राजकीय जाणकारांनी केली होती. आता निवडणुकीच्या मध्यात ममतांनी ही भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीचं भविष्य काय असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
West Bengal: मुस्लिम मतदार कोणत्या पक्षास अनुकूल? मत खेचण्यासाठी भाजपसह ‘तृणमूल’कडून प्रयत्न सुरु
पंतप्रधान मोदींवर डागली तोफ
बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर दोन महिन्यांच्या कालावधीत निवडणुकांचे वेळापत्रक आखल्याबद्दल टीका केली आणि तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून भाजपच्या बाजूने निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला. बॅनर्जी म्हणाल्या, ‘निवडणूक आयोग एक बाहुली आहे जी मोदींच्या सूचनेनुसार काम करते. अडीच महिन्यांपासून मतदान सुरू आहे, तुम्हाला (निवडणूक अधिकाऱ्यांना) सर्वसामान्यांच्या समस्यांची कधी जाणीव झाली का?

Source link

Congressindia alliancemamata banerjeeoutside supporttmctmc supremowest bengalइंडिया आघाडीकाँग्रेसतृणमूल काँग्रेसपश्चिम बंगालममता बॅनर्जी
Comments (0)
Add Comment