Birth Numerology : २, ११, २० किंवा २९ तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? वाचा एका क्लिकवर

Numerology Prediction :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्यांची रास, जन्म मूलांक आणि भविष्य ठरवले जाते. ग्रहांच्या संक्रमणामुळे आपल्याला भविष्यात होणाऱ्या गोष्टी काही प्रमाणात कळतात. तर अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीचे त्याच्या जन्मतारखेच्या आधारे भविष्य ओळखता येते.

अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला असेल तर त्यांचा मूलांक क्रमांक २ असतो. मूलांक २ हा चंद्र ग्रह आहे. या तारखेला जन्मलेले लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक, दयाळू आणि साधे मनाचे असतात.

जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ११ तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक क्रमांक १+ १ =२ असेल. त्याचप्रमाणे २९ तारखेला जन्म झाला असेल तर २+ ९ =११ = १+ १ = २ असा होतो. जाणून घेऊया मूलांक २ असणाऱ्या व्यक्तींबद्दल.
Name Astrology : या नाव अक्षराचे लोक असतात अधिक मेहनती; प्रेमात मिळते अपयश, तुमचे नाव यात आहे का? वाचा सविस्तर
1. अंकशास्त्रानुसार मूळ क्रमांक २ असलेले लोक खूप काळजी घेणाऱ्या स्वभावाचे असतात. मूलांक क्रमांक २ चा स्वामी चंद्र आहे. चंद्रामुळे हे लोक थोड भावनिक असतात. तसेच या लोकांना कोणावर तरी अवलंबून राहाण्याची सवय असते.

2. ज्या लोकांचा मूलांक क्रमांक २ असतो. त्यांची संरचना थोडी वेगळी असते. त्यांच्या व्यक्तीमत्त्वामुळे ते सहज आकर्षित होतात. ते अतिशय सर्जनशील असतात.
मूलांक क्रमांक २ असलेल्या लोकांना मात्र त्यांच्या कामाला सतत समर्थानाची गरज असते. ते कोणतेही काम करतात, त्यांना प्रेरणा हवी असते. तसेच मूलांक क्रमांक २ असलेल्या लोकांना कोणत्याही कामात यश न मिळल्यास ते निराश होतात. ते स्वभावाने ते लवकर निराश होतात.

3. मूलांक क्रमांक २ असलेले लोक खूप भावनिक असतात. त्यामुळे ते कोणत्याही गोष्टीचा खूप जास्त विचार करतात. त्यामुळे ते एकच काम फार काळ करु शकत नाही.
Shukra Gochar 2024 : शुक्र ग्रहाचे वृषभ राशीत संक्रमण! या ६ राशींना मिळणार छप्परफाड पैसा; इच्छुकांचे लग्न जुळणार
4. मूलांक क्रमांक २ असलेल्या लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव देखील दिसून येतो. हे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ असून चांगले शिक्षण घेतात. त्याचबरोबर त्यांना पैसे जमावण्याची सवय असते. यामुळे यांची आर्थिक स्थिती चांगली असते. पैसे कमावण्यात ते अतिशय हुशार असतात.

5. या व्यक्ती स्वभावाने थोड्या रागीष्ट असतात पण त्यांच्या मनात काहीही नसते. मन अतिसंवेदनशील असल्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्या अधिक विचार करतात. परंतु, त्यांची निर्णय क्षमता चांगली असते. या मूलांकाच्या व्यक्ती हुशार, बुद्धिवान आणि हळव्या मनाच्या असतात.

6. कोणतीही गोष्ट त्या सहज विसरत नाही. काम करण्याची वेळ आली की, ज्या कामात बौद्धिक आणि शारीरिक श्रम करण्याची गरज आहे ते करतात. त्यांना अनेक गोष्टींवर विचार करायला आवडते.

7. मूलांक क्रमांक २ असलेल्या लोकांचे मूलांक क्रमांक १ आणि ५ असलेल्या लोकांशी खूप चांगले संबंध असतात. तसेच या लोकांकडून त्यांना अधिक पाठिंबा मिळतो. तर मूलांक क्रमांक ८ आणि ९ असेल तर त्यांच्याशी याचे अजिबात पटत नाही.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

astrologyBirth DateBirth numerologyfuture predictionhoroscopemulank 2rashi bhavishya in marathi
Comments (0)
Add Comment