Maratha Reservation: नेमकं काय करणार आहात; चंद्रकांत पाटलांचा संभाजीराजेंना सवाल

हायलाइट्स:

  • मराठा आरक्षणावरून भाजपचा संभाजीराजेंना सवाल
  • नेमकं काय करणार आहात ते लोकांना सांगा
  • आरक्षणासाठी निघणाऱ्या प्रत्येक मोर्चात सहभागी होणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: ‘मराठा आरक्षणासाठी १६ जूनला मोर्चा काढण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली होती. आता ते मूक आंदोलन करणार असं म्हणत आहेत. आमदार, खासदारांना जाब विचारण्याची भाषा करत आहेत. नंतर पुणे-मुंबई ‘लाँग मार्च’ काढणार असं ते म्हणत आहेत. ते नेमकं काय करणार आहेत हे संभाजीराजेंनी समाजापुढं मांडावं,’ असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हाणला आहे. (Chandrakant Patil Taunts Sambhajiraje Bhosale)

वाचा: मराठा आंदोलनास कारणीभूत ठरलेले कोपर्डी पुन्हा चर्चेत, कारण…

संभाजीराजे भोसले यांनी कालच मराठा आरक्षणासाठी जिल्ह्याजिल्ह्यात मूक आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्याबद्दल कोल्हापूर इथं पत्रकारांनी विचारलं असताना पाटील यांनी पुन्हा एकदा भाजपची भूमिका मांडली. ‘मराठा आरक्षणासाठी कुठलीही संघटना मोर्चा काढणार असेल तर आम्ही त्यात सहभागी होऊ अशी आमची भूमिका आहे. ती कायम आहे. संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी रायगडावरून मोर्चाची घोषणा केली होती. १६ जून रोजी हा मोर्चा निघणार होता. पण आता त्यात बदल झाला आहे. आपण अशी घोषणा केलीच नव्हती असं ते म्हणत असतील तर आमची हरकत नाही,’ असं पाटील म्हणाले.

वाचा: ‘योगी विरुद्ध मोदी’ ही भाजपची खेळी; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

‘आरक्षणाच्या आंदोलनामध्ये संभाजीराजेंचं नेतृत्व पुढं आलं आहे. पहिल्या दिवसापासून त्यांचं नेतृत्व आम्ही मान्य केलं आहे. मात्र, आंदोलनाच्या बाबतीत चालढकल केली गेली तर ते समजण्याइतका मराठा समाज सूज्ञ आहे, हे संभाजीराजेंनी ध्यानात ठेवलं पाहिजे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला नाही तर नवीन नेतृत्व उभं राहील की नाही माहीत नाही. पण मराठा समाजाचं यातून मोठं नुकसान होईल. तरुणांमध्ये नैराश्य येईल. सरकारला पळ काढण्यासाठी आपण मदत करणार आहोत का? याचा विचार त्यांनी करायला हवा,’ असं पाटील म्हणाले.

वाचा: राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना पत्र; म्हणाले, तुम्ही मला समजून घ्याल!

Source link

chandrakant patilChandrakant Patil Taunts Sambhaji RajeMaratha Reservationsambhajiraje bhosaleकोल्हापूरचंद्रकांत पाटीलमराठा आरक्षणसंभाजारीजे भोसले
Comments (0)
Add Comment