Motorola Edge 50 Fusion ची किंमत
Motorola Edge 50 Fusion भारतात 22,999 रुपयांच्या बेस प्राइसमध्ये लाँच करण्यात आला आहे. ही किंमत या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तसेच या फोनच्या 12GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे. हा फोन मोटोरोलाच्या ऑफिशियल वेबसाइट आणि Flipkart वरून विकत घेता येईल. 22 मे 2024 पासून हा फोन ऑफलाइन देखील विक्रीसाठी उपलब्ध होईल. ICICI बँक क्रेडिट कार्ड्स आणि EMIच्या माध्यमातून या फोनवर 2 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळवता येईल.
Motorola Edge 50 Fusion चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 50 Fusion मध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा कर्व pOLED डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. फोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आहे, जो 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. हा स्मार्टफोन Android 14 OS आउट ऑफ द बॉक्ससह येतो.
Motorola Edge 50 Fusion मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 50-megapixel Sony LYT-700C प्रायमरी सेन्सर आहे. हा ऑप्टिकल इमेज स्टॅबलाइजेशनला सपोर्ट करतो. तसेच यात 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
Motorola Edge 50 Fusion मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळते, जी 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो. यात Bluetooth 5.2, ड्युअल SIM काला सपोर्ट पण तुम्हाला मिळत आहे. फोनचे वजन 174.9 ग्राम आहे.