आजच्या काळात सोशल मीडिया हा ऑनलाइन फसवणुकीचा सर्वात सोपा मार्ग बनला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य युजर्सची फसवणूक होत आहे. वास्तविक, हॅकर्स फेसबुक, इंस्टाग्राम आणि लिंक्डइन सारख्या तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुमची वैयक्तिक माहितीची चोरी करतात आणि नंतर तुमचा मित्र असल्याचे भासवतात आणि तुमची फसवणूक करतात. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी.
फसवणूक कशी केली जाते
स्कॅमर तुमच्या सोशल मीडियावरून तुमच्या जवळच्या मित्रांना शोधतात, नंतर तुम्हाला कॉल करतात आणि म्हणतात की मी तुमचा मित्र आहे, माझा अपघात झाला आहे. फोन तुटला आहे, ज्यामुळे सिम कॉर्ड काम करत नाही. मी दवाखान्यात भरती आहे, मला थोडे पैसे ट्रान्सफर करा. यानंतर तुम्ही त्याने दिलेल्या नंबरवर पैसे ट्रान्सफर करा. अशा विविध बहाण्याने तुमच्याकडून पैसे लुटले जातात.
अशातच अनेक लोक ठरतात स्कॅमचे बळी
स्कॅमर्स तुमच्याशी अशा प्रकारे बोलतील की तो तुमचा मित्र आहे यावर तुमचा विश्वास बसेल. पण आजच्या काळात ऑनलाइन गर्लफ्रेंड बनवणे टाळले पाहिजे. कारण हनीट्रॅपद्वारे तुम्हाला लुटले जात आहे. बहुतेक अशी प्रकरणे नोंदवली जात नाहीत. पेचपोटी लोक हनी ट्रॅपची प्रकरणे पोलिसांकडे नोंदवत नाहीत, त्यामुळे गुन्हेगार सहज सुटतात.
या स्कॅमपासून स्वतःचा बचाव कसा कराल
- सर्वप्रथम, तुम्ही तुमचा सोशल मीडिया सार्वजनिक करू नका, जेणेकरून तुमच्या सोशल मीडियावरून कोणतीही माहिती अज्ञात व्यक्तीला मिळू नये.
- कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा फ्रेंड लिस्टमध्ये समावेश करू नये.
- डेबिट किंवा बँकिंग डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका.
- कोणत्याही अज्ञात Wi-Fi वर किंवा इतर कोणाच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर आपल्या खात्यात लॉग इन करू नका.
- सोशल मीडियावर स्वतःबद्दल कमीत कमी माहिती शेअर करा.
- ऑनलाइन डेटिंग आणि मित्र बनवणाऱ्या साइट्स आणि ॲप्सपासून सावध रहा.