Swati Maliwal Case : स्वाती मालीवाल हल्ला प्रकरण, विभव कुमार यांना राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, १७ तारखेला हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने आज (१६ मे ) विभव कुमार यांना नोटीस बजावली. विभव कुमार हे केजरीवाल यांचे निकटवर्तीय आहेत. स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतः दखल घेतली असून त्यांना विभव कुमार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच १७ मे रोजी कार्यालयात हजर राहण्यास कुमार यांना सांगण्यात आले आहे. जर हजर राहिला नाही तर पुढील कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.

आयोगाने दिल्ली पोलिसांकडून मागवला कारवाईचा अहवाल

राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांना पत्र लिहीत दिल्ली पोलिसांकडून तीन दिवसांत कारवाईचा अहवाल मागवला आहे. त्याचबरोबर विभव कुमार यांना आयोगाने नोटीस बजावताच दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी आणि अतिरिक्त डीसीपी हे दोन पोलिस अधिकारी मालिवाल यांच्या घरी पोहोचले आहेत. मालीवाल यांचा जबाब नोंदवण्यासाठी घरी गेले असल्याचे सांगण्यात आले आहेत.
ममता बॅनर्जींचं इंडिया आघाडीला ‘बाहेरुन समर्थन’; राजकीय वर्तुळात खळबळ

स्वाती मालीवाल यांचे आरोप काय आहेत?

खासदार स्वाती मालीवाल या सोमवार (१३ मे) मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटायला आल्या आणि ड्रॉईंग रूममध्ये थांबल्या. त्यानंतर विभव कुमार तेथे पोहोचले आणि स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन करत मारहाण केली. असा आरोप मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर केला आहे.
शिवसेना पक्ष, चिन्हाबद्दल प्रकरणात नवी अपडेट; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली

केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा

या प्रकरणावरून भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” स्वाती मालीवाल या आमच्या विरोधी पक्षातील नेत्या आहेत. परंतु त्यांना न्याय मिळायला हवा यासाठी भाजप लढत आहे. देशातील महिला संतप्त असून केजरीवाल यांनी या प्रकरणावर उत्तर द्यावे आणि जर शांत बसायचे असेल तर राजीनामा द्यावा”. अशी मागणी केली आहे.

Source link

crimedelhijusticespoliceअरविंद केजरीवालदिल्ली पोलिसराष्ट्रीय महिला आयोगविभव कुमारस्वाती मालीवाल
Comments (0)
Add Comment