देशाच्या एकूण श्रमशक्तीमध्ये बेरोजगारांच्या टक्केवारीला बेरोजगारी दर म्हणतात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी मार्च तिमाहीत बेरोजगारीचा दर ६.८% होता. यानंतर, एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर तिमाहीत तो ६.६ % होता. मागच्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबमध्ये बेरोजगारी दर साडेसहा टक्क्यांपर्यंत वाढला.
पीरियोडिक लेबर फोर्स च्या सर्वेक्षणानुसार (पीएलएफएस) यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या तिमाहीत शहरी भागात १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील सरासरी बेरोजगारी दर पुरुषांमध्ये ६.१ % व महिलांमध्ये साडेआठ टक्के होता. गेल्या वर्षीच्या जानेवारी-मार्च तिमाहीत हाच दर ९.२% होता.
गत वर्षी याच कालावधीत बेरोजगारी दर ६ टक्के होता
एप्रिल-जून 2023 मध्ये तो ९.१ %, जुलै-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ मध्ये हा दर ८.६ टक्के होता. २०२४ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत शहरी भागातील पुरुषांमधील बेरोजगारीचा दर ६.१ % आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर ६ टक्के होता. मागच्या वर्षी एप्रिल-जून मध्ये तो ५.९ %, जुलै-सप्टेंबर मध्ये ६% आणि ऑक्टोबर-डिसेंबर या काळात ५.८ टक्क्यांवर होता.
श्रमशक्ती म्हणजे काय?
श्रमशक्ती हा लोकसंख्येच्या व रोजगाराच्या मापनाचा एक भाग आहे. यामध्ये नोकरदार आणि बेरोजगार दोघांचाही समावेश केलेला असतो. पीएलएफएस ने एप्रिल २०१७ मध्ये श्रमशक्ती उपक्रम सुरू केला होता. यात प्रत्येक तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर, कामगार लोकसंख्येचे प्रमाण, कामगार सहभागाचा दर यासारख्या अनेक बाबींवरील माहिती (डेटा) जारी केली जाते.