विदर्भात आणखी एका राजकीय पक्षाची भर; ‘जय विदर्भ पार्टी’ची घोषणा

हायलाइट्स:

  • आणखी एका राजकीय पक्षाची भर
  • विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून राजकीय आघाडी जाहीर‘
  • ‘जय विदर्भ पार्टी’ची घोषणा

नागपूर : विदर्भात आणखी एका राजकीय पक्षाची भर पडली आहे. कारण विदर्भ राज्य आंदोलन समितीने राजकीय आघाडी म्हणून ‘जय विदर्भ पार्टी’ची शनिवारी घोषणा केली आहे.

विदर्भ जनता काँग्रेस, विदर्भ राज्य पार्टी, विदर्भ माझा, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य संघर्ष समिती अशा अनेक पक्ष व संघटनांनी वेगळ्या राज्याच्या मुद्यावर निवडणुकांमध्ये केलेले प्रयत्न याआधी अपयश ठरले आहेत. अशातच आता विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून ‘जय विदर्भ पार्टी’ची स्थापना करण्यात आली आहे.

रामदास कदम प्रकरणात नवा ट्विस्ट; ज्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यानेच केला खुलासा

‘शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कुपोषण, माओवाद, दुष्काळ, अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि विकास यासाठी वेगळे राज्य हाच एकमेव उपाय आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून वेगळ्या राज्याची मागणी रेटण्यासाठी पक्षाची स्थापना केली आहे,’ असं या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राम नेवले यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पक्षाची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, या पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये प्रस्थापित पक्षांना हादरे देत विदर्भात काही राजकीय यश मिळवता येतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

seperate vidarvha stateVidarbhaनागपूरविदर्भस्वतंत्र विदर्भ
Comments (0)
Add Comment