जेव्हापासून अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मानवाला पुन्हा चंद्रावर उतरवण्याची योजना आखली आहे, तेव्हापासून संपूर्ण जगाचे डोळे नासाकडे लागले आहेत. नासाचे आर्टेमिस मिशन हे शक्य करण्याचा मानस आहे. आता यावेळी नासाची इच्छा आहे की, आपल्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर तळ तयार करावा आणि तेथे दीर्घकाळ राहावे. त्यासाठी अनेक प्रकारची तयारी केली जात आहे आणि काही प्रकल्पांवर कामही सुरू आहे. या प्रकल्पांतंर्गत नासाने चंद्राच्या पृष्ठभागावर ‘फ्लाइंग रोबोट ट्रेन’ तयार करण्याची योजना जाहीर केली आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये यूएस स्पेस एजन्सीच्या “फ्लेक्झिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (फ्लोएट)” नावाच्या या प्रकल्पाची माहिती देण्यात आली आहे.
रोबोटिक वाहतूक व्यवस्था
चंद्रावर पोहोचणाऱ्या अंतराळवीरांना रोबोटिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. एका निवेदनात नासाने म्हटले आहे की, 2030 च्या दशकात परमनंट मून बेस (चंद्रावरील कायमस्वरूपी तळ) ऑपरेट करण्यासाठी चंद्रावरील वाहतूक व्यवस्था खूप महत्त्वाची असेल.
चंद्रावरील पहिली रेल्वे प्रणाली
NDTV च्या रिपोर्टनुसार, नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे रोबोटिक्स तज्ज्ञ एथन स्केलर यांनी सांगितले की, आम्हाला चंद्रावर पहिली रेल्वे प्रणाली तयार करायची आहे, जी चंद्रावर विश्वसनीय, ऑटोनॉमस आणि ड्युरेबल पेलोड ट्रान्सपोर्टेशन प्रदान करेल. 2030 मध्ये परमनंट मून बेस चालवण्यासाठी लांब पल्ल्याच्या रोबोटिक वाहतूक प्रणालीची आवश्यकता असेल, असे ते म्हणाले.
अंतराळवीरांसाठी वाहतूक व्यवस्था
नासाच्या सुरुवातीच्या डिझाईनवरून असे दिसून येते की, FLOAT सिस्टीम फक्त मशीनवर अवलंबून असेल. चुंबकीय रोबोट चंद्रावर पोहोचतील आणि त्यात वाहने बसवली जातील. त्या गाड्या ताशी 1.61 किलोमीटर वेगाने धावतील. असा अंदाज आहे की चंद्रावर धावणारी वाहने दररोज 100 टन सामग्री मून बेसपर्यंत पोहोचवतील.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ज्या भागात अंतराळवीर सक्रिय असतील तेथे वाहतूक सेवा प्रदान करणे हा आहे. FLOAT प्रणाली पूर्णपणे ऑटोनॉमसअसेल. चंद्राच्या धुळीच्या आणि कठीण वातावरणात हे काम करेल. गरजेनुसार, नासा ही प्रणाली पुन्हा कॉन्फिगर करेल. विशेष बाब म्हणजे NASA च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (JPL) मध्ये FLOAT प्रणाली तयार केली जात आहे. सध्या, कॅलिफोर्नियामध्ये प्रणालीच्या वेगवेगळ्या भागांची चाचणी केली जात आहे.