देशाला भक्कम पंतप्रधानांची गरज, इंडिया आघाडीकडे चेहरा आहे का? : अमित शाह

बिहार : ‘सत्तेत आल्यास पंतप्रधानपदाची खुर्ची घटक पक्षांमध्ये फिरवण्याचा इंडिया आघाडीचा विचार आहे,’ असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केला. बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभेत ते बोलत होते. ‘देशाला वार्षिक आधारावर नव्हे, तर कायमस्वरूपी आणि भक्कम पंतप्रधानांची गरज आहे,’ असेही शहा म्हणाले.

‘इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही. देशाने मोदींना तिसऱ्यांदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीचा नेमका कोण पंतप्रधान होईल, हे तुम्ही मला सांगू शकाल का? ही विरोधी मंडळी कोणत्याही परिस्थितीत सत्तेत येत नाहीत, हे माहीत असूनही त्यांनी पंतप्रधानांची खुर्ची आपापसात फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. देश चालवणे म्हणजे किराणा दुकान चालवण्यासारखे नाही. पुनश्च करोनासारखी स्थिती निर्माण झाली, तर ते देशाला वाचवू शकतील का, दहशतवाद्यांपासून देशाचे रक्षण करू शकतील का,’ असे सवालही शहा यांनी उपस्थित केले.
‘त्यांनी बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्या घालायला भाग पाडू’; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घणाणाती टीका

एनडीए सरकार गोहत्येच्या विरोधात, आम्ही गोहत्येला परवानगी देणार नाही

बिहारच्या ईशान्य भागात पूर्वी जनावरांची तस्करी होत होती, असा दावा करून शहा म्हणाले,‘एनडीए सरकार गोहत्येच्या विरोधात आहे. आम्ही कोणत्याही किमतीत गोहत्येला परवानगी देणार नाही.’

पीएफआयवर बंदी घालण्याचा निर्णय योग्यच, कारण…

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर शहा म्हणाले, ‘हा योग्य निर्णय होता. कारण, देशाचे रूपांतर इस्लामिक राष्ट्र करण्याची ‘पीएफआय’ची मनीषा होती.’

Source link

amit shahAmit shah Attack India Allianceअमित शाहअमित शाह इंडिया आघाडी टीकाइंडिया आघाडी
Comments (0)
Add Comment