police were stoned: खंडेराव नगरात दोन गटात दंगल; पोलिसांवरच केली दगडफेक

हायलाइट्स:

  • बाजारात एका मुलीची छेड काढल्यावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास दोन गटांत झाला वाद.
  • एक गट दुसऱ्या गटाला जाब विचारायला गेला असता दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी.
  • या संघर्षात पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली.

म.टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहरातील खंडेराव नगर भागात असलेल्या आझाद नगर भागात शनिवारी रात्री दोन गटात वाद झाला. घटनास्थळी मोठा जमाव जमला. दोन्ही बाजूने दगडफेक झाली आहे. दरम्यान, पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांवरही दगडफेक झाल्याने तणाव वाढला आहे. (big conflict between the two groups two groups in khanderao town and police were stoned)

शहरातील खंडेराव नगर परिसरात असलेल्या आजाद नगर भागात आज सायंकाळी शनिवारचा बाजार होता. बाजारात एका मुलीची छेड काढल्यावरून रात्री आठ वाजेच्या सुमारास वाद झाला. एक गट दुसऱ्या गटाला जाब विचारायला गेला असता दोन्ही गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाली.

क्लिक करा आणि वाचा- ठाण्यात एकाच दिवशी एकाच केंद्रावर १०,०१० करोना प्रतिबंधक लसीकरण

वाद वाढल्याने काही वेळाने दोन्ही कडील गट आमनेसामने येऊन दगडफेक सुरू झाली. वादात एका गटाने पोलिसांच्या सीसीटीव्ही कमेऱ्यांची देखील तोडफोड केली. घटनास्थळी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे पथकासह पोहचले असता त्यांच्यावर देखील दगडफेक करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि क्यूआरटी पथक पोहचले आहे.

क्लिक करा आणि वाचा- कोस्टल रोड कामातील भ्रष्टाचाराचे आरोप अयोग्य; पालिकेचा पुन्हा खुलासा
क्लिक करा आणि वाचा- दिलासा! राज्यात आज करोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट; ‘अशी’ आहे ताजी स्थिती!

Source link

big conflict between the two groupspolice were stonedजळगावात दोन गटांमध्ये संघर्षदोन गटांमध्ये दंगलपोलिसांवर दगडफेक
Comments (0)
Add Comment