Breaking : दिल्ली भाजप प्रादेशिक कार्यालयाला लागली भीषण आग, अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली – भाजपच्या दिल्ली प्रादेशिक कार्यालयाला आज (१६ मे) आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील पंडीत पंत मार्गावर हे भाजपचे कार्यालय असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. दुपारी ४:२५ च्या सुमारास हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे.

चार दिवसांत दुसरी घटना –

या आधी मंगळवारी (१३ मे) दिल्लीच्या आयटीओ परिसरात असलेल्या आयकर विभागाच्या इमारतीत आग लागली होती. या घटनेत एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, तसेच दोन महिलांसह सात जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर एक जण किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मध्य दिल्लीतील आयकर विभागाची इमारत जिथे आग लागली ती जुन्या पोलीस मुख्यालयाच्या अगदी समोर आहे. या इमारतीत अजूनही सुरक्षा दलाच्या काही तुकड्या आहेत.

Swati Maliwal Case : स्वाती मालीवाल हल्ला प्रकरण, विभव कुमार यांना राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, १७ तारखेला हजर राहण्याचे आदेशमंगळवारी दुपारी ३.०७ वाजता आयकर विभागाच्या इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली होती. एकूण २१ अग्निशमन गाड्या पाठवण्यात आल्या आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कळवण्यात आले होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये इमारतीतील लोक आगीपासून वाचण्यासाठी खिडकीच्या कड्यांचा आसरा घेत असल्याचे दिसून आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पायऱ्यांच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यास मदत केली.

Source link

bjpbjp officedelhifirefire accidentfire brigadeअग्निशमन दलदुर्घटनानियंत्रणशॉर्ट सर्किट
Comments (0)
Add Comment