सावधान! वाढदिवसाची तारीख किंवा मोबाईल नंबरमधील आकड्यांचा पिन म्हणून वापर करुन नका, जागतिक कंपनीने दिला इशारा

भारतात देखील अनेक लोक डिजिटली सुरक्षित राहण्यासाठी सिक्युरिटी पिनचा वापर करतात. अनेकदा ही लोक असे पिन सेट करतात जे क्रॅक करणे हॅकर्ससाठी खूप सोपे असते. हे सायबर हल्ले वाढण्याचे सगळ्यात प्रमुख कारण आहे. चेक पॉईंट सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीजच्या अहवालात असे म्हटले आहे की 2024 च्या पहिल्या तिमाहीत, सायबर हल्ल्यांमध्ये वार्षिक 33% वाढीसह भारत टार्गेटेड देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर होता. लोकांनी आपली माहिती लोकांच्या नजरांपासून लपवण्यासाठी वापरलेले अतिशय सोपे पिन हल्लेखोरांना हे करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात.
कमकुवत पिन हा हल्लेखोरांसाठी कोणत्याही सिस्टिममध्ये प्रवेश करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. कमकुवत पिन काहीही असू शकतो, जसे की ‘0000’ किंवा ‘1234’ किंवा एखाद्या व्यक्तीच्या वाढदिवसाची तारीख, जी आजकाल अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रोफाइलवर सार्वजनिकपणे लोकांनी शेअर केलेली असते. काही लोक पिन म्हणून त्यांच्या फोन नंबरचे पहिले किंवा शेवटचे अंक देखील वापरतात, त्यांचा फोन नंबर देखील हल्लेखोर सहजपणे मिळवू शकतात हे जाणून घेतल्याशिवाय ते असे करतात

नुकत्याच झालेल्या सायबर सुरक्षा अभ्यासात असे दिसून आले आहे की बरेच लोक त्यांच्या सुरक्षा कोडमध्ये अतिशय सामान्य आकडे वापरतात. तपासण्यात आलेल्या ३४ लाख पिनपैकी हे सर्वात सामान्य पिन आहेत:
  • 1234
  • 1111
  • 0000
  • 1212
  • 7777
  • 1004
  • 2000
  • 4444
  • 2222
  • 6969

डेली मेलशी बोलतांना, ESET सायबरसुरक्षा तज्ञ, जेक मूर यांनी सांगितले अतिशय सोप्या पासकोडचा वापर कोणीही करू नये, ज्यामुळे लोक सायबर हल्ल्यांना बळी पडू शकतात. मूर यांच्या मते, बरेच लोक ही रिस्क घेतात आणि या हल्ल्याचे बळी ठरतात.

पुढे ते म्हणाले, “कोणताही हॅकर या पिनचा सहज शोध लावू शकतो आणि यामुळे तुमची मोठी फसवणूक होऊ शकते.”

इतर काही अतिशय साधे आणि सामान्य 4-अंकी पिन खालीलप्रमाणे आहेत:-

  • 8557
  • 8438
  • 9539
  • 7063
  • 6827
  • 0859
  • 6793
  • 0738
  • 6835
  • 8093

Source link

birthdate as passwordcommon pinCyber Securitymost common passwordsPIN codeसायबर सुरक्षा
Comments (0)
Add Comment