बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी नेमका काय? अमित शहांनी सांगितलं ६० टक्क्याचं गणित

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष दणदणीत विजयी मिळवेल आणि नरेंद्र मोदी सत्ता कायम राखतील, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केला. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. अब की बार चारसे पारची घोषणा भाजपला विरोधकांमुळे गुंडाळावी लागली. त्यावरही शहांनी पक्षाची बाजू मांडली.

अब की बार ४०० पारचा नारा देत भाजपनं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. पण या घोषणेला विरोधकांनी प्रत्युत्तर दिलं. संविधानात बदल करण्यासाठी, आरक्षण संपवण्यासाठी भाजपला ४०० जागा हव्या आहेत, असा प्रचार विरोधकांनी सातत्यानं केला. त्यामुळे भाजप काहीसा बॅकफूटला आला. मोदींनी त्यांच्या भाषणातून चारशे जागांचा उल्लेख कमी केला. त्यामुळे भाजपनं ही घोषणा गुंडाळल्याचं चित्र निर्माण झालं. यावर आता शहांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
Sharad Pawar: शरद पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला अजितदादांच्या शिलेदाराची भेट; चर्चांना उधाण
संविधान बदलासाठी आमच्याकडे १० वर्षांपासून बहुमत आहे. पण आम्ही कधीही संविधानात बदल करायचा प्रयत्न केला आहे. आम्ही बहुमताचा कधीही दुरुपयोग केला नाही. बहुमताचा गैपवापर इंदिरा गांधींनी केला होता, असं शहा म्हणाले. आम्हाला ४०० जागा जिंकायच्या आहेत. कारण आम्हाला देशाच्या राजकारणात स्थिरता हवी आहे. देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी आम्हाला चारशे जागा हव्या आहेत, असं शहा यांनी सांगितलं.
Chhagan Bhujbal: भुजबळ नाराज, गोडसेंच्या प्रचारात दिसेनात; जयंत पाटलांनी ‘जनाधार’ काढला, तटकरेंकडून सारवासारव
आमच्याकडे १० वर्षांपासून बहुमतात आहोत. त्याचा वापर आम्ही कशासाठी केला? आम्ही काश्मीरमधून ३७० कलम हटवलं, तिहेरी तलाक संपवून मुस्लिम महिलांना न्याय दिला, राम मंदिराची उभारणी केली, असं म्हणत शहांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कामांची यादीच वाचली. इंदिरा गांधींप्रमाणे आम्ही बहुमताचा गैरवापर केला नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.

बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आल्यास भाजपकडे काही प्लान बी आहे का? असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. प्लान ए अपयशी ठरण्याची शक्यता ६० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्लान बीची गरज लागते. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं सत्तेत येतील याबद्दल मला विश्वास वाटतो. त्यामुळे प्लान बीची आवश्यकता भासणार नाही, असं शहा ठामपणे म्हणाले.

Source link

amit shahlok sabha election 2024Narendra Modiअमित शहानरेंद्र मोदीलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment