या गॅजेटचं नाव Q Collar असं म्हणतात आणि हा गॅजेट प्लेयर्सची ब्रेन इंजरीची जोखीम कमी करतो. विशेष म्हणजे कॅडमोरनं याआधी देखील Q Collar घातली होती. त्याने ही कॉलर 17 ऑगस्ट 2023 मध्ये घातली होती. तेव्हा देखील हा डिवाइस चर्चेचा विषय ठरला होता. चला जाणून घेऊया या डिवाइसची वैशिष्ट्ये.
Q Collar चा उपयोग काय?
हा एक प्रोटेक्टिव्ह डिवाइस आहे, जो ब्रेन इंजरीची जोखीम करतो. क्रिकेट किंवा इतर खेळ खेळताना मेंदूला इजा होण्याची शक्यता जास्त असते. Q Collar त्या धक्क्याचे परिणाम कमी करते. हा डिवाइस Q30 Innovations नं तयार केला आहे.
ही कॉलर मानेच्या नसांवर हलकासा प्रेशर तयार करते, त्यामुळे मेंदूत रक्ताचे प्रमाण वाढते. त्यामुळे मेंदू स्थिर राहतो आणि इजा झाल्यास मेंदूची हालचाल कमी होते. डोक्याला धक्का बसल्यास मेंदूच्या हालचालीमुळे ब्रेन इंजरी होते. हा डिवाइस ब्लड वॉल्यूम वाढवतो आणि त्यामुळे ब्रेन इंजरीची शक्यता कमी होते.
क्रिकेटमध्ये Q Collar वापरता येते का?
क्रिकेटमध्ये हेल्मेटमुळे चांगली सुरक्षा मिळते. यामुळे खेळाडूंना ब्रेन इंजरी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या खेळात ब्रेन इंजरीचे प्रमाण कमी आहे. परंतु क्रिकेट खेळताना गंभीर दुखापत झाल्याच्या देखील घटना आहेत. त्यामुळे या कॉलरचा वापर करणे चांगला ऑप्शन आहे. ICC नं क्रिकेट मॅच दरम्यान हेल्मेट वापरणे अनिवार्य केलं आहे. परंतु Q Collar बद्दल आतापर्यंत कोणतीही नियम बनला नाही. क्यू कॉलरची किंमत 199 डॉलर (जवळपास 16,600 रुपये) आहे.