Fact Check : राहुल गांधींनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असं म्हटलंय? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे कथितपणे असं बोलताना ऐकू येतात की लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होतील आणि इंडिया आघाडीला यूपीमध्ये एकही जागा मिळणार नाही. राहुल गांधींचा हा व्हिडिओ अनेक युजर्स फेसबुक, यूट्यूब आणि एक्सवर शेअर करत आहेत.

फेसबुकवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, की राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीत आपली हार पत्करली आहे. इतर काही युजर्सच्या पोस्ट इथे, इथे, इथे, इथे आणि इथे पाहता येतील. मात्र या व्हिडिओचा तपास केला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला राहुल गांधींचा हा व्हिडिओ एडिटेड आहे.

राहुल गांधींनी व्हायरल व्हिडिओमध्ये काय म्हटलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राहुल गांधी असं बोलत आहेत, की ‘नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होतील. सुरुवातीला, मी तुम्हाला सांगतो, खरे काय आहे ते म्हणजे ४ जून २०२४ पर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असतील. तुम्ही ते लिहून घ्या. नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान होऊ शकतात. आम्हाला जे काही करायचं होतं, जे काही काम, जी काही मेहनत करावी लागणार होती ती आम्ही केली आहे. आता तुम्ही बघा, आमच्या युतीला उत्तर प्रदेशात एकही जागा मिळणार नाही. तेही हसत आहेत कारण त्यांनाही माहीत आहे की राहुल गांधी जे बोलत आहेत ते खरे आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होत आहेत.’
Fact Check: काँग्रेस नेते राहुल गांधींनी संविधान संपवण्याचं म्हटलं? जाणून घ्या व्हायरल दाव्याचं सत्य
राहुल गांधींच्या या व्हायरल व्हिडिओची लॉजिकल फॅक्टच्या टीमने पडताळणी केली. या व्हायरल व्हिडिओची चौकशी केली असता, या व्हिडिओचं सत्य समोर आलं आहे. लॉजिकल फॅक्टने सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यांचं सत्य जाणून घेण्यासाठी या व्हायरल व्हिडिओचा संपूर्ण व्हिडिओ शोधला. १० मे २०२४ रोजी काँग्रेसच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ सापडला. व्हिडिओतील माहितीनुसार, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील कानपूरचा असून तिथे राहुल गांधी एका जाहीर सभेला संबोधित करत होते.

ज्यावेळी खरा व्हिडिओ पाहण्यात आला, त्यावेळी व्हिडिओच्या सुरुवातीच्या ५७ सेकंदांनंतर राहुल गांधी असं म्हणतात, की ‘बंधु आणि भगिनींनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो, की जी गोष्ट भारतीय मीडिया कधीही सांगणार नाही, पण ती गोष्ट खरी आहे, ४ जून २०२४ रोजी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असणार नाहीत. ही गोष्ट लिहून घ्या, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनू शकत नाहीत. आम्हाला जे करायचं होतं, जे काम, जी मेहनत करायची होती, आम्ही केली आहे. आता तुम्ही पाहाल उत्तर प्रदेशात आमच्या आघाडीला ५० पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत.’

‘बाकी देशातील प्रत्येक राज्यात आम्ही भाजपला रोखलं आहे. त्यानंतर राहुल गांधी म्हणतात, की आता तुम्ही त्यांचे (मीडिया लोकांचे) चेहरे बघितले तर तेही हसत आहेत, कारण त्यांनाही कळलं आहे की राहुल गांधी जे बोलत आहेत ते खरं आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत.’

या सर्व लाइन्स व्हिडिओच्या ७५ सेकंदापासून २.४८ मिनिटांपर्यंत ऐकता येऊ शकतात. यानंतर हे स्पष्ट झालं आहे की राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्याची बाब म्हटली नाही. राहुल गांधींचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एडिट करुन पोस्ट करण्यात आला आहे.

निष्कर्ष

Logically Fact च्या पडताळणीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची बाब म्हटलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावर युजर्स जो व्हिडिओ शेअर करत आहेत, तो एडिटेड आहे आणि सध्या निवडणुकांच्या काळात हा व्हिडिओ अपप्रचार करण्यासाठी शेअर केला जात आहे.

(This story was originally published by Logically Fact, and republished by MT as part of the Shakti Collective.)

Source link

fact check newsRahul Gandhirahul gandhi Fact Checkrahul gandhi viral video fact checkफॅक्ट चेक बातमीराहुल गांधीराहुल गांधी व्हायरल व्हिडिओ
Comments (0)
Add Comment