Swati Maliwal : दोषी आढळल्यास केजरीवालांवर कारवाई केली जाईल; राष्ट्रीय महिला आयोगाचा इशारा

नवी दिल्ली : आपच्या खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडून मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना गुरुवार (१६ मे) नोटीस बजावण्यात आली होती. आयोगाच्या आदेशानुसार त्यांना आज (१७ मे) सकाळी ११ वाजता कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु कुमार हजर राहिले नाहीत.

तर मुख्यमंत्र्यांवर सुद्धा कारवाई करू

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, ” विभव कुमार यांना आम्ही नोटीस बजावली होती. परंतु ते हजर राहिले नाही. आज आमचे पथक पुन्हा नोटीस बजावण्यासाठी केले आहे. हे प्रकरण गंभीर असून त्याची कसून चौकशी केली जाईल. तसेच मुख्यमंत्री जर दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल.”
Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लान बी नेमका काय? अमित शहांनी सांगितलं ६० टक्क्याचं गणित

आपल्याच नेत्याच्या घरी मारहाण होईल अशी अपेक्षा नव्हती

रेखा शर्मा म्हणाल्या पुढे म्हणाल्या की, ”जेव्हा सोशल मीडियावर पाहिले तेव्हा आम्ही स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली. आम्ही सर्वकाही बारकाईने पाहत होतो. स्वाती मालीवाल यांना धक्का बसला होता, कारण त्यांच्या नेत्याच्या घरी मारहाण होईल अशी अपेक्षा स्वाती यांनी केली नव्हती.”

छातीवर, पोटावर लाथा मारल्याचा मालीवाल यांचा आरोप

स्वाती मालीवाल यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बिभव कुमार यांनी स्वाती मालीवाल यांच्या छातीवर, पोटावर आणि शरीराच्या खालच्या भागावर लाथा मारल्याचा आरोप केला आहे. मी आरडाओरडा केला तरी ते मला मारायचे थांबले नाही. अशी माहिती मालीवाल यांनी एफआयआरमध्ये दिली आहे.
मटा ग्राऊंड रिपोर्ट: वाराणसीवासीयांचे ‘हमार मोदी’! अवघे शहर भाजपमय, ‘हर दिल मे मोदी’चे वातावरण

भाजपने केजरीवालांना धरलं धारेवर

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणावरून भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. स्वत:च्या पक्षातील नेत्यावर हल्ला होत असताना मुख्यमंत्री गप्पा का? असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. महिला खासदाराला मारहाण होणे हे अतिशय निंदनीय आहे. केजरीवाल यांनी या प्रकरणावर बोलावे अन्यथा राजीनामा द्यावा असं भाजपने म्हटलंय.

Source link

aapbjpkejariwalnational commission for womenrekha sharmaswati maliwalएफआयआरगुन्हेगारीमुख्यमंत्रीसोशल मीडिया
Comments (0)
Add Comment