उन्हाळ्यात ACमधून येतेय दुर्गंधी, जाणून घ्या काय असू शकते कारण

उष्णतेने सध्या तीव्र स्वरुप धारण केले आहे. अशा परिस्थितीत कडक उन्हामुळे एअर कंडिशनर ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. दरम्यान, अशी वेळ येते जेव्हा कुलर उकाड्यावर योग्य काम करत नाहीत AC अशा प्रसंगी उष्णतेवर रामबाण इलाज ठरतात. पण विचार करा, अचानक तुमच्या एसीमधून दुर्गंधी येऊ लागली तर? ही दुर्गंधी इतकी वाईट असते की एखाद्या व्यक्तीला मळमळ आणि चक्कर देखील येऊ शकतात. सहसा हा वास कुजलेल्या किंवा जळलेल्या एखाद्या वस्तूसारखा असू शकतो, जो सहन करणे कठीण आहे.

एसीमधून वास येण्याचे एक कारण म्हणजे तो हाय टेंप्रेचरवर चालवला जाणे. दुसरे म्हणजे, हे त्याच्या खराबीमुळे आणि सर्व्हिसिंग न केल्यामुळे ही समस्या निर्माण होते, या दुर्गंधीची अनेक कारणे असू शकतात, ज्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो.

1. बुरशी आणि बॅक्टेरिया

ओलसर आणि घाणेरड्या ठिकाणी वाढणारे बॅक्टेरियाज हे दुर्गंधीचे एक प्रमुख कारण असू शकतात. जर तुमच्या एअर कंडिशनरची ड्रेनेज सिस्टीम नीट काम करत नसेल, तर पाणी साचू शकते आणि बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे दुर्गंधी पसरू शकते.

2. धूळ आणि घाण

कालांतराने, एअर कंडिशनरचे फिल्टर आणि एअर डक्ट्स हे धूळ, घाण आणि इतर गोष्टींमुळे खराब होऊ शकतात. जेव्हा हवा त्यातून जाते तेव्हा एक दुर्गंधी येते.

2. जळलेल्या तारा किंवा मशिनमध्ये झालेला बिघाड

जर तुम्हाला एअर कंडिशनरमधून जळकट वास येत असेल, तर ते एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते ज्यामुळे आग लागू शकते.

ACमधून येणारी दुर्गंधी कशी दूर कराल?

एअर कंडिशनरमधून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही पुढील काही उपाय करू शकता…

1. AC साफ करणे

एअर कंडिशनरचे फिल्टर आणि एअर डक्ट नियमितपणे स्वच्छ करा. तुम्ही एकतर ते स्वतः स्वच्छ करू शकता किंवा एखाद्या मॅकेनिककडून ते करून घेऊ शकता. तसेच ड्रेनेज सिस्टम तपासा आणि आवश्यक असल्यास स्वच्छ करा.

2. बुरशी आणि बॅक्टेरियाचे उपचार

जर तुम्हाला बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढण्याची शंका असेल, तर एअर कंडिशनर अँटी-फंगल किंवा अँटी-बॅक्टेरियल लिक्विडने स्वच्छ करा. तुम्ही मॅकेनिककडून एअर कंडिशनर स्वच्छ आणि डिसइन्फेक्ट देखील करू शकता.

3. एसी दुरुस्ती

तुम्हाला जळलेल्या तारा किंवा यांत्रिक बिघाडाचा संशय असल्यास, प्रोफेशनल इलेक्ट्रिशियन किंवा एअर कंडिशनर मॅकेनिकला त्वरित कॉल करा.

या पद्धती देखील उपयुक्त ठरतील

एअर कंडिशनरचा नियमित वापर करा. आठवड्यातून किमान एकदा काही मिनिटे एअर कंडिशनर चालवा.

  • एअर फिल्टर योग्य वेळी साफ करत रहा.
  • ओलसरपणा किंवा पाण्यापासून एअर कंडिशनरचे प्रोटेक्शन करा.
  • सीझन सुरू होताच एसीची सर्व्हिसिंग करून घ्या.
  • एसीचे ड्रेन पॅन स्वच्छ करण्याची विशेष काळजी घ्या.

एअर कंडिशनरमधून येणारा येणारी दुर्गंधी केवळ विचित्र गोष्ट नसून ती तुमच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकतो.

Source link

ac problemsac smell badHealthProfessionalप्रोफेशनल
Comments (0)
Add Comment