राज्यासाठी Good News! सर्वाधिक साठवण क्षमता असणाऱ्या उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल

हायलाइट्स:

  • राज्यासाठी Good News!
  • सर्वाधिक साठवण क्षमता असणाऱ्या उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल
  • सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला असून धरणात पाणी साठा वाढण्याची शक्यता

सोलापूर : पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत आहे,धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा वाढल्यास हे धरण १०० टक्के भरणार आहे, सध्या ९६ टक्के भरले असून गेल्या दोन दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने ३ दिवसांत ६ टक्के पाणी साठा वाढला आहे. (good news for the state ujani dam which has the highest storage capacity is 100 full)

सध्या पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने धरणात येणारा विसर्ग खूपच मंदावला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्याची वाढ ही धिम्या गतीने सुरू आहे.उजनी धरणातील पाणी साठ्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ऊस, तरकारी आणि फळ उत्पादक, शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रविवारी सकाळी उजनीतील पाणी साठा ९६.०४ टक्के आहे, तर आवक दौंड येथे ४ हजार ६२३ क्यूसेक्स आहे. बंडगार्डन (पुणे) येथे केवळ २ हजार ९१६ क्यूसेक्स आवक असून उपयुक्त पाणी साठा ५१.४५ टीएमसी इतका झाला आहे.

मुंबई-गोवा क्रुझवरील पार्टीमध्ये प्रवेशासाठी होता हा ‘कोडवर्ड’, NCB चा मोठा खुलासा
पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत धरणावर मुसळधार पाऊस झाल्यान धरणात ६ टक्केची भर पडली आहे. तर गेल्या १५ दिवसात जेमतेम १३ टक्के पाणी साठा वाढला आहे. पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग अगदीच कमी आहे.मात्र सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू झाला असून धरणात पाणी साठा वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी सकाळी धरणाने ९६ टक्के ची पातळी ओलांडून ९६.०४ टक्के ची मजल मारली आहे. हा महत्वाचा टप्पा गाठला असून तीन दिवसांत १०० टक्के कधी होण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाचा जोर प. महाराष्ट्रात कमी आहे.त्यामुळे उजनीकडे लागलेले शेतकऱ्यांचे डोळे अजूनही धरण पूर्ण क्षमतेने कधी भरणार याकडे लक्ष लागले आहे. (good news for the state ujani dam which has the highest storage capacity is 100 full)

मुंबई काँग्रेसमध्ये आत्तापासूनच बदलांचे वारे, विविध सेलच्या पुनर्रचनेसह अध्यक्षांची होणार बदली

Source link

Good newshighest storage capacity damujani damujani dam information in marathiujani dam updateujani dam water levelujani dam water level today marathiujani dam water level update
Comments (0)
Add Comment