हायलाइट्स:
- आर्यन खानसह ताब्यात घेतलेल्यांवर होणार मोठी कारवाई
- NCB चे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची डॅशिंग कारवाई
- ड्रग्ज कोणी पुरवले याची NCB ला करायची चौकशी
मुंबई : मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Mumbai Narcotics Control Bureau)शनिवारी रात्री समुद्राच्या मध्यभागी क्रूझ शिपमध्ये (Cruise Rave Party)चाललेल्या ड्रग्ज (Drugs) पार्टीवर छापा टाकला. यामध्ये १० लोकांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन(Shahrukh khan Son Aryan) यांचा समावेश आहे. ड्रग्ज प्रकरणात सर्वांची चौकशी केली जात आहे. एनसीबी क्रुझ जहाजावर इतक्या प्रमाणात कशी पोहोचली याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.
ताब्यात घेतलेल्यांपैकी काही जणांना सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तेच लोक ज्यांनी ड्रग्जचा व्यापार केला नाही आणि फक्त त्यांचे सेवन केले. त्यांना विशेष नारकोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट कोर्टात हजर केले जाईल. जर त्यांच्याकडून जप्त केलेल्या डॅग्जचे प्रमाण जास्त नसेल, तर त्यांना एनडीपीएस कायद्यांतर्गत जामीन दिला जाईल, परंतु त्यांना बॉण्डवर स्वाक्षरी करावी लागेल.
ड्रग्ज कोणी पुरवले याची NCB ला करायची चौकशी
सुत्रांचे म्हणणे आहे की, या लोकांना ताब्यात घेण्याचा हेतू एवढा मोठा मादक पदार्थ जहाजावर कसा पोहोचला हे जाणून घेणे आहे. या प्रकरणात तपास पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो. कारण ड्रग्ज कोणी पुरवले याची NCB ला करायची चौकशी आहे.
क्रूझवर छापा टाकल्यानंतर १० जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. NCB चे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना ड्रग्स संदर्भात टीप मिळाली होती. यानंतर तो आणि त्याची टीम प्रवासी म्हणून जहाजावर पोहोचली.
समुद्राच्या मध्यभागी ड्रग्ज पार्टी
सूत्रांनी सांगितले की, जहाज मुंबईतून बाहेर पडून समुद्रकिनाऱ्यावर पोहचताच त्यामध्ये ड्रग पार्टी सुरू झाली. अशा स्थितीत जहाजावर उपस्थित असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून औषधांचा ताबा घेतला आणि शोधमोहीम सुरू केली. वानखेडे म्हणाले की, आम्ही काही लोकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आता काहीही बोलणे फार लवकर आहे.
यावेळी, NCB प्रमुख एस.एन. प्रधान म्हणाले की, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि शिपिंग मिनिस्ट्रीला पत्र आणि तपशीलवार माहितीसह या शिप ड्रग्ज पार्टीची माहिती दिली जाईल. सुमारे १५ दिवसांपूर्वी जहाजावरील ड्रग्ज पार्टीबद्दल अत्यंत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही हे ऑपरेशन केले.